Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘साला खडूस’च्या रूपात आर. माधवन!

माधवन
एका मागून एक हिट चित्रपट दिल्यानंतर 16 ऑक्टोबरला आर. माधवनची मुख्य भूमिका असलेला ‘साला खडूस’ हा धडाकेबाज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 
 
आर. माधवन राजकुमार हिराणी यांच्या ‘थ्री इडियट’ चित्रपटानंतर दुसर्‍यांदा त्यांच्या चित्रपटात भूमिका साकारत आहे. सुधा कोंगरा प्रसाद ‘साला खडूस’ चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. चित्रपटाची कथाही त्यानेच लिहिली आहे. सुधा कोंगराला बॉलीवूडमध्ये संधी देऊन राजकुमार हिराणीने दाक्षिणात्य दिग्दर्शकाला हिंदीत नवा प्रयोग करू दिला आहे. 
 
यापूर्वी मणीरत्नमसोबत सुधा कोंगराने काम केले आहे. ‘साला खडूस’ चित्रपटात आर. माधवनसोबत तिका सिंह, मुमताज सरकार आणि झाकिर हुसैन यांच्या भूमिका आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi