Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘हिरो’ पाहणार्‍यांसाठी सलमानची खास ऑफर!

सूरज पांचोली
सूरज पांचोली आणि आथिया शेट्टी यांचा ‘हिरो’ सिनेमा पाहणार्‍यांसाठी सलमान खानने खास ऑफर दिली आहे. सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकांच्या तिकिटांवर सलमान खान ऑटोग्राफ देणार आहे. सलमानने ऑटोग्राफ केलेली काही तिकिटं ट्विटरवर शेअरही केली आहेत. Signed some tickets of Hero The Film that you had sent. Keep Sending. Will Sign more tomorrow . tag HeroKaTicket असं ट्विट करत सलमान खानने प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड नोंदवणारा ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमानंतर ‘हिरो’ हा सलमान खान प्रॉडक्शनचा दुसरा सिनेमा आहे.

हा सिनेमा रिलीज होण्याच्या आधीच सलमानने ही ऑफर दिली आहे. ज्या प्रेक्षकांनी सिनेमा पाहिला आहे, त्यांनी त्यांची तिकिटं ट्विटरवर पोस्ट करण्याचं आवाहन सलमानने केलं आहे. त्यातील निवडक 100 तिकिटांवर सलमान खान ऑटोग्राफ देणार आहे. सलमान खानच्या या आवाहनाला त्याच्या चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi