Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोरंजनासाठी हा 'चेंज' हवाच- उदिता

मनोरंजनासाठी हा 'चेंज' हवाच- उदिता

वेबदुनिया

, सोमवार, 19 एप्रिल 2010 (11:56 IST)
जहर, अक्सर, अगर हे चित्रपट केलेल्या उदिता गोस्वामीचा 'चेंज' हा नवा चित्रपट लवकरच रिलीज होतो आहे. जगमोहन मुंद्रा हे त्याचे दिग्दर्शक आहेत. त्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या या गप्पा....

IFM
IFM


चेंज कसा चित्रपट आहे?
- हा थ्रिलर चित्रपट आहे. त्यात चित्तथरारक स्टंट्सही आहेत.

या चित्रपटात तूही साहसी दृश्ये केली आहेस काय?
- हो. अशी साहसी दृश्ये करताना मजा आली. मला साहसी चित्रपटही विशेषत्वाने आवडतात.

जगमोहन मुद्रांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- जगजी कधी अतिशय कठोर वागतात तर कधी अगदीच मेणाहून मऊ. पण ते अतिशय अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. भविष्यात त्यांच्याबरोबर काम करायला मला नक्की आवडेल.

प्रेक्षकांनी तुझा हा चित्रपट का पहावा?
- हा अतिशय मनोरंजक चित्रपट आहे. लोकांना पहायला जे आवडते ते यात आहे.

तू कॉमेडी चित्रपट करणार नाहीस, असे तुझ्याबाबतीत सांगितले जाते. ते खरे आहे काय?
- नाही. हे विधान खोटे आहे. कॉमेडी चित्रपट करायला मला नक्की आवडेल. लोकांना हसविणे हा वेगळा अनुभव असेल.

आणखी कोणते चित्रपट तू करते आहेस?
- सनी देओलबरोबर 'द मॅन' आणि अक्षय कुमार सोबत 'हॅलो इंडिया' हे चित्रपट आहेत.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi