Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माळव्यातला श्रेष्ठ श्री सर्वोत्तम दिवाळी अंक

माळव्यातला श्रेष्ठ श्री सर्वोत्तम दिवाळी अंक
, सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (16:27 IST)
महाराष्ट्रात दिवाळी विषेशांकांची परंपरा आता शंभर वर्षांपेक्षा देखिल फार जुनी आहे. पण बृहनमहाराष्ट्रात बोटांवर मोजण्या इतपतच चारपांच दिवाळी विशेषांक प्रकाशित होतात. यात माळव्यातून (इंदूर, मध्यप्रदेश) गेल्या पंधरा वर्षांपासून प्रकाशित होत असलेला श्री सर्वोत्तम दिवाळी अंक आपली श्रेष्ठता टिकवून असतो. फार श्रेष्ठ दर्जाचा कागद, उत्तम छपाई, उत्तम बांधणी आणि यात श्रेष्ठ दर्जेदार साहित्य म्हणजे ‘ सोने पे सुहागा.’  श्री सर्वोत्तमच्या दिवाळी अंकांना महाराष्ट्रात अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे .
 
२०१९ चा श्री सर्वोत्तमचा दिवाळी अंक देखिल आपल्या प्रतिष्ठे प्रमाणे साजेसा आहे. दर वर्षी एक नवा विषय देऊन लेखकांना त्या विषयावर लिहिते करणे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचे धोरण एकूण साहित्यात दिसून येते . मागच्या (२०१८ ) वर्षीचा विषय होता ‘पृथ्वीतत्व‘ तर या वर्षीच्या दिवाळी अंकासाठीचा विषय होता ‘आकाश तत्व.‘     
 
आकाशतत्व या विषयाच्या लेखात अनेक रोचक, ज्ञानवर्धक आणि माहितीसाठी प्रकाशित लेखांमधे, डॉ.प्रदीप तराणेकर यांचा ‘वेद पुराण कालीन विमानयंत्र‘, केप्टन डॉ. आनंद जयराम बोडस यांचा लेख ‘आकाश तत्वांची हवाई जाणीव‘, डॉ.मोहन बांडे यांचा लेख ‘तुका आकाशा एवढा‘, प्रसिद्द संगीतकार कौशल इनामदार यांचा लेख ‘खिड़की एवढे आभाळ‘, वसंत साठे यांचा लेख ‘इसरोचे निर्धारित लक्ष चंद्रयान-२‘, कर्नल सारंग थत्ते (सेवानिवृत) यांचा लेख ’उंच आकाश घे भरारी‘, रुतराज.वि.पत्की यांचा लेख ‘ऑस्टेराईडस आंगतुक पाहुणे‘, संतोष.डी.पाटील यांचा लेख ‘अनमोल स्वयं प्रकाश तारे‘, तर स्नेहा वाघ यांचा लेख ‘मायेचं आभाळ‘  आणि मेघना साने यांचा लेख ‘पहाट अनुभवताना’ असे सार्थक लेख आहेत. 
 
आकाशतत्व या विषयाशिवाय या ‘श्री सर्वोत्तम‘ च्या दिवाळी अंकात इतरही बरचं काही आहे. प्रवासवर्णनात हरी मुस्तीकर यांचा लेख ‘नार्दन लाईट निसर्गाचा चमत्कार‘, हेमलता वैद्य यांचा लेख ‘सुन्दर भूतान‘ आणि माणिक भिसे यांचा लेख ‘डेन्यूब चे लेकरु‘ हा आहे.       
                                
प्रसिद्द रंगकर्मी बाबा डिके यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या स्मृतींना स्मरण करत अरुण डिके यांचा लेख ‘बाबा डिके-जन्म शताब्दी वर्ष‘ आणि प्रसिद्ध रंगकर्मी श्रीराम जोग यांचा लेख ‘बाबा‘ हे वाचनीय आहेत. या शिवाय सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना श्रीमती लीला गांधीची ओळख करविणारा जयश्री तराणेकर यांचा लेख आहे. डॉ. प्रदीप शंकर तराणेकर यांनी ‘तारांगण‘ या सदरात १२ राषिंच्या १२ महिन्यांच्या भविष्यावर आढावा घेतला आहे. एकूण ५० पेक्षा जास्त नामवंत कवीं आणि गजलकारंच्या कविता आणि गजलने सजलेल्या या दिवाळी अंकात सुप्रसिद्ध लेखिका पद्मश्री मालती जोशीं सकट एकूण १७ दर्जेदार कथा वाचकांना बांधून ठेवतात. श्री सर्वोत्तमचा हा अंक नक्कीच वाचनीय आहे.

-विश्वनाथ शिरढोणकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हसण्याचे पाच फायदे