Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असा आहे बौद्ध धर्म

असा आहे बौद्ध धर्म
ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. या दोन धर्मांनंतर बौद्ध हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. चीन, जपान, कोरीया, थायलंड, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, भुतान व भारत या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात. 

गुप्तकाळात हा धर्म ग्रीस, अफगाणिस्तान व अनेक अरब देशांत पोहोचला होता. परंतु, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामुळे त्याचे उच्चाटन झाले.

बौद्ध हा नास्तिकांचा धर्म आहे. कर्मामुळेच जीवनात सुख व दुःख येते. त्यामुळे सर्व कर्मातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळविणे अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. कर्मातून मुक्त होण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार आर्य सत्य समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अष्टांग मार्गाचा अभ्यास केला पाहिजे. त्या द्वारेच मोक्ष मिळू शकेल असे हा धर्म सांगतो.

भगवान बुद्धांनी स्थापन केलेल्या या धर्मात हिनयान व महायान हे दोन संप्रदाय आहेत. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध जयंती असते. बौद्ध धर्मियांची प्रमुख चार तीर्थ स्थळे आहेत. लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. बौद्ध धर्मग्रंथाला त्रिपिटक असे म्हटले जाते.

भगवान बुद्धाला गौतम बुद्ध, सिद्धार्थ, तथातगत व बोधिसत्व या नावानेही ओळखले जाते. बुद्धाचे वडिल कलिलवस्तुचे राजा शुद्धोधन हे होते. त्यांच्या आईचे नाव महामाया देवी असे होते. बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा आणि मुलाचे नाव राहूल होते.

बुद्धाचा जन्म वैशाखातील पौर्णिमेच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सन पूर्व ५६३ मध्ये झाला. याच दिवशी इसवी सन ५२८ ला बोधगया येथे त्यांना सत्याची प्राप्ती झाली. याच दिवशी इसवी सन ४८३ ला ८० व्या वर्षी कुशीनगर येथे त्यांचे निर्वाण झाले.

बुद्धाला ज्या दिवशी सत्याची प्राप्ती झाली, त्याच दिवशी ते काशीजवळील सारनाथ येथे गेले. तेथे त्यांनी पहिल्यांदा उपदेश केला. त्यात लोकांना मध्यम मार्गाचा अवलंब करावा असा सल्ला त्यांनी दिला. दुःख, त्याची कारणे आणि त्याचे निवारण करण्यासाठी अष्टांगिक मार्ग अवलंबिण्यास त्यांनी सांगितले. अंहिसेचा पुरस्कार केला. यज्ञ, कर्मकांड, पशुबळी यांच्याविरोधात बोलले.

बौद्ध संप्रदाय-
बुद्धाच्या वेळी कोणताच संप्रदाय वा पंथ नव्हता. परंतु त्यानंतर मात्र मतभेद होऊन हिनयान व महायान हे पंथ तयार झाले. महायान म्हणजे मोठी नौका वा गाडी तर हिनयान म्हणजे छोटी गाडी वा नौका. महायान संप्रदायांतर्गतच वज्रयान नावाचीही एक उपशाखा होती. झेन, ताओ, शिंतो हेही बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जातात.

बुद्धाचे गुरू व शिष्य-
बुद्धाचे प्रमुख गुरू हे होते. - गुरु विश्वामित्र, अलारा, कलम, उद्दाका रामापुत्त आदी. बुद्धआचे शिष्य होते आनंद, अनिरुद्ध, महाकश्यप, राणी खेमा (महिला), महाप्रजापति (महिला), भद्रिका, भृगु, किम्बाल, देवदत्त, उपाली आदी. प्रमुख प्रचारक- अंगुलिमाल, मिलिंद (ग्रीस सम्राट), सम्राट अशोक, ह्वेन त्सांग, फा श्येन, ई जिंग, हे चो आदी.

बौद्ध धर्मग्रंथ-
बौद्ध धर्माची मूळ तत्वे ही आहेत- चार आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग, निर्वाण. बुद्धाने आपली शिकवण पाली भाषेत दिली. ती त्रिपिटीकामध्ये संकलित केली आहे. त्रिपिटक तीन भागात आहे. विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या पिटकांमध्येही अनेक उपग्रंथ आहेत. सुत्तपिटकमध्ये धम्मपदे आहेत. धम्मपदे लोकप्रिय आहेत.

बौद्ध तीर्थ-
लुंबिनी, बोधगया, सारनाथ व कुशीनगर ही चार प्रमुख बौद्ध तीर्थस्थळे आहेत. या ठिकाणी जगभरातील बौद्ध अनुयायी येत असतात. लुंबिनी नेपाळमध्ये आहे. बोधगया भारतात बिहारमध्ये तर सारनाथ उत्तर प्रदेशात काशीजवळ आहे. कुशीनगरही उत्तर प्रदेशात गोरखपूरजवळ आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाणून घ्या बौद्ध धर्माचे तीन सिद्धांत