राग मनात धरून ठेवणे म्हणजे विष पिणे आणि दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखे आहे.
जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात, रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे.
रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा. अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल.
प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ. हे दोन जीव एकत्र आले की ते परिपूर्ण होतात. प्रेमाने जग जिंकता येते.
एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून
घेऊ शकत नाही.
एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांंतता मिळते. त्यामुळे नेहमी चांगलेच बोला. वाह्यात बोलून शब्दसंपदा खर्च करू नका.
नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल.
कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते
आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.
जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका.
लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ
तुम्हाला नक्कीच मिळेल.
आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल.
प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल.
कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.
दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही. पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे.
आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. कोणावरही अवलंबून राहू नका.
दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे.
लोक आयुष्यात येतात आणि जातात पण जे योग्य असतात ते कायम राहतात आणि ते मित्र असतात.
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या जी गोष्ट तुम्हाला अधिक कमकुवत करत असेल ती गोष्ट सोडून द्या कारण ते तुमच्या आयुष्यातील विष आहे.
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानकारक आयुष्य हे अधिक महत्त्वाचे असते.