Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्जमाफीचा निर्णय अभूतपूर्व- शरद पवार

कर्जमाफीचा निर्णय अभूतपूर्व- शरद पवार

वार्ता

नवी दिल्ली , शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (14:05 IST)
शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय स्वातंत्र्य भारतात शेतकर्‍यांसाठी घेण्यात आलेला सर्वांत मोठा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

बजेटमध्ये लहान शेतकर्‍यांचे साठ हजार कोटीचे कर्ज माफ करण्यात आल्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जाहीर केले. या घोषणेने आनंद झालेल्या पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की देशातील शेतकर्‍यांसाठी आजपर्यंत एवढी मोठी घोषणा कधीच केली गेली नव्हती. देशातील ७५ टक्के शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्याचा फायदा चार कोटी शेतकर्‍यांना मिळणार आहे.

उर्वरित २५ टक्के शेतकर्‍यांच्या कर्जात त्यांना सवलत देण्यात आली आहे. कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ऐतिहासिक असे पाऊल उचलल्याचे पवारांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi