Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुलाल उधळून हमालांनी साजरा केला आनंद..

गुलाल उधळून हमालांनी साजरा केला आनंद..

वार्ता

रेल्वेच्या अधिकृत हमालांना रेल्वे सेवेत गँगमन आणि अन्य चतुर्थ श्रेणीच्या पदांवर नियुक्त करण्यात येणार असल्याच्या रेल्वे मंत्र्यांच्या घोषणे नंतर पाटणा रेल्वे स्टेशनवरील हमालांनी मिठाई वाटून आणि गुलालाची उधळणं करत आपला आनंद साजरा केला.

एवढ्यावरच न थांबता या सार्‍या हमालांनी लालू प्रसाद यादव आणि केंद्र सरकारच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.आता हे सर्वच हमाल रेल्वेचे कर्मचारी होणार असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची ही मागणी मान्य झाली आहे.

या रेल्वे अर्थ संकल्पात ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच देशभरातील हमालांनी दिला आहे. परंतू रेल्वे मंत्र्यांच्या या घोषणेने ते अत्यंत खूश झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi