प्राप्तीकर मर्यादेत वाढ
*आता दीड लाखापर्यंतच्या उत्पन्नावर करमाफी
*आयकराची मर्यादा १ लाख १० हजारावरून १ लाख ५० हजारापर्यंत
*महिलांसाठीच्या प्राप्तीकर मर्यादेत वाढ. १ लाख ४५ हजारावरून १ लाख ८० हजारापर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही
*ज्येष्ठ नागरिकांचे २ लाख २५ हजारापर्यंतचे उत्पन्न करमाफ. ही मर्यादा १ लाख ९५ हजारावरून २ लाख २५ हजारापर्यंत.
*तीन ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के प्राप्तीकर
*अल्पकालीन भांडवली उत्पन्नात १५ टक्क्यांनी वाढ
*कमॉडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा नवा कर लागणार
स्वस्त होणार
दुचाकी गाड्या स्वस्त होणार. त्यावरील कर १६ टक्क्यांवरून बारा टक्क्यांपर्यंत
कॉर्पोरेट इन्कम टॅक्स दरात काहीही बदल नाही.
*पॉलीमरच्या उत्पादनासाठी नाप्थावरील ड्यूटी माफ
*रेफ्रिजरेशनसंदर्भातील घटक स्वस्त होणार
*एड्सवरील औषधांवरील अबकारी करात कपात
*नॉन फिल्टर सिगरेटवरील ड्यूटीत वाढ
*पाणी शुद्ध करण्याच्या वस्तूंवरील अबकारी करांत आठ टक्क्यांनी घट
*कागद व कागदाधारीत वस्तूंवरील अबकारी कर माफ
*बस, चेसीसवरील अबकारी दरात कपात
*छोट्या कारवरील अबकारी कर १४ टक्क्यांपर्यंत
*फार्मा वस्तूंवरील अबकारी करात १४ टक्क्यांपर्यंत कपात
*जनसर सेनव्हॅट दर सर्व वस्तूंवर १६ वरून १४ टक्क्यांवर
*स्टील मेल्टिंग स्क्रॅप व अल्युमिनियम स्क्रॅपच्या करांत कपात
*काही औषधांच्या कस्टम ड्यूटीत पाच टक्क्याने घट
*क्रूड सल्फरवरील कस्टम ड्यूटीत पाच टक्क्याने घट
*कर्न्व्हर्जन्स प्रॉक्ट्समधील ड्यूटीत पाच टक्क्याने घट
*सेट टॉप बॉक्सेसवरील ड्यूटी पूर्णपणे माफ
कररचना
*कस्टम ड्यूटीच्या दरात काहीही बदल नाही
*द्वितीय व तृतीय श्रेणीच्या भागांत रूग्णालये उभारल्यास पाच वर्षे कर नाही
*विनाब्रॅंडेड पेट्रोलवर प्रती लीटर १.३५ रूपये अबकारी कर
*विनाब्रॅंडेड डिझेलवर प्रती लीटर ४.६ रूपये अबकारी कर.
*सेंट्रल सेल्स टॅक्समध्ये दोन टक्क्यांनी कपात
*बॅंकिंग ट्रान्झॅक्शन टॅक्स काढून टाकणार
*कॉर्पोरेट सरचार्ज टॅक्समध्ये बदल नाही.
*युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारशाच्या ठिकाणी असलेल्या टू, थ्री, फोर स्टार हॉटेल्सना पाच वर्षे कर भरावा लागणार नाही.
शेतकर्यांना कर्जमाफी
*लहान शेतकर्यांची सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्तता
कर्जबाजारी शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची आणि त्यांना कर्जातून दिलासा देण्याची योजना
*कर्जमाफीची एकूण रक्कम बॅंक कर्जाच्या चार टक्के
*एकूण पन्नास हजार कोटींपर्यंतचे कर्ज माफ
*येत्या तीस जूनपर्यंत कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी होणार
*कर्जमाफीमुळे बॅंकांचे शेअर कोसळले
*एनआरएचएमसाठी आता बारा हजार ०५० कोटींपर्यंत अनुदानात वाढ
*जमिनीची प्रत तपासण्यासाठी ५०० प्रयोगशाळा देशभर उभारणार
*बजेटच्या ताळेबंदात महसुली तुटीचे प्रमाण १.४ टक्के
*सहाव्या वेतन आयोगाचा अहवाल मार्चपर्यंत येणार
*राष्ट्रीय वाघ संवर्धन संस्थेला पन्नास कोटीचे अनुदान
*सांस्कृतिक विकासासाठी आयसीसीआरला ७५ कोटी रूपये
*योजना आयोग घेणार महत्त्वाच्या योजनांचा आढावा
*संरक्षण खर्चासाठी दहा टक्के वाढीव निधी. आता हा निधी १ लाख ०५ हजार ६०० कोटी
*सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ३२ हजार ६७६ कोटीची सबसिडी
*२२ सैनिकी शाळांना प्रत्येकी ४४ कोटी देणार
*देशातील २५० जिल्ह्यात जमीनीची प्रत तपासणार्या प्रयोगशाळांसाठी कृषी खात्याला ७५ कोटी देणार
*कौशल्य विकास कार्यक्रमासाठी विनानफा तत्वावर काम करणार्या संस्थांना पंधराशे कोटी देणार
*जागतिक दर्जाचा कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणार
*हरीयाना व चंडीगडमध्ये स्मार्ट कार्डावर आधारीत सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था
*सार्वजनिक वितरण व्यवस्थेला आणखी सशक्त करणार
*कोळसा नियंत्रकाची स्थापना करणार
*विणकरांच्या सतरा लाख कुटुंबांना आरोग्यविम्याचे संरक्षण
*वीज विकास का४यक्रमांना ८ हजार कोटी मिळणार
*तिलाना येथे अत्याधुनिक मोठा वीज प्रकल्प
*एनएचडीपीसाठी १२ हजार ९५६ कोटी रूपये
*आरआयडीएफ कॉर्पसमध्ये चौदा हजार कोटींपर्यंत वाढ
*वीज वितरणासाठी आठशे कोटी रूपये
*उत्पादन दर दुहेरी नेण्याचे उद्दिष्ट
*स्टेट डाटा सेंटर्स स्कीम मंजूर, त्यासाठी २७५ कोटी रूपये
*ग्रामीण भागात ब्रॉडबॅंड आधारीत एक लाख सर्व्हिस सेंटर
*एनएचडीपी प्रोग्रॅमसाठी निधीत वाढ
विकासाच्या दिशेने
* सर्व शिक्षा अभियानाला १३ हजार १०० कोटी मिळणार
* भारत निर्माण योजनेला ३१ हजार २० कोटी मिळणार
* ४१० शाळा खेड्यात उघडणार
* सहा हजार मॉडेल हायस्कूल उभारणार
* कृषी विकास दर अवघा २.६ टक्के
* शिक्षण व आरोग्य हे सामाजिक सुधारणांचे मुख्य आधारस्तंभ
* विज्ञान व संशोधनासाठी शिष्यवृत्ती
* शिक्षण व आरोग्यासाठी वीस टक्के निधी देणार
* सेवा क्षेत्रात १०.७ टक्क्यांची वाढ
* आंध्र प्रदेश, बिहार व राजस्थानात ३ आयआयटी
* सोळा केंद्रीय विद्यापीठे
* दुपारच्या जेवणाची योजना आता प्राथमिक स्तराच्या पुढच्या वर्गातही राबविणार
* माध्यंदिन भोजन योजनेसाठी आठ हजार कोटींचा निधी
* ११० जिल्ह्यात दहा कोटी रूपये नेहरू केंद्रासाठी
* योजना व वास्तुविशारद शास्त्राच्या दोन शाळा उघडणार
* माध्यमिक शिक्षण योजनेसाठी ४ हजार ५५४ कोटी रूपये
* शंभर कोटी रूपये विज्ञान व तंत्रज्ञान नेटवर्कसाठी
* सर्व शिक्षणसंस्था ब्रॉडबॅंडने जोडणार
* नॉलेज सोसायटी उभारण्यासाठी ८५ कोटी
* राजीव गांधी पेयजल योजनेसाठी निधीत वाढ
* एनआरईजी योजना आता ५९६ जिल्ह्यात सुरू करणार
* राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेसाठी निधीत पंधरा टक्के वाढ
* अंगणवाडीत सहाय्यक कर्मचार्यांच्या वेतनात साडेसातशे रूपयांची वाढ
* अंगणवाडी कर्मचार्यांच्या वेतनात पंधराशेने वाढ
* ३ आयआयएससीएस भोपाळ व त्रिवेंद्रममध्ये
* असंघटित क्षेत्रातील प्रत्येक कामगाराला तीस हजाराचा आरोग्य विमा
* ईशान्य भारतातील विकासासाठी १३५० कोटी
* राजीव गांधी नॅशनल फेलोशिप प्रोग्रॅमसाठी ७५ कोटी
* राष्ट्रीय अपंग विकास महामंडळाला ९ कोटी मिळणार
* राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास महामंडळाला ७५ कोटी मिळणार
* एकात्मिक बालविकास (आयसीडीएस) साठी ६३०० कोटी रूपये
* चेन्नईजवळ डिझलानेशन प्लांटसाठी तीनशे कोटी
* स्वच्छता योजनांसाठी बाराशे कोटी
* निमलष्करी दलांत अल्पसंख्याक समाजाला आणखी स्थान
* अल्पसंख्याकांसाठी स्थापित मंत्रालयाच्या निधीत दुपटीने म्हणजे १००० कोटीने वाढ
* अल्पसंख्यांकाच्या जिल्ह्यात २८८ सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या शाखा
* अल्पसंख्याक जिल्हे विकासासाठी ५४० कोटी रूपये
* एसईजी'ज महिलांना आयुर्विम्याचे संरक्षण
* शाळातील पिण्याच्या पाण्यासाठी दोनशे कोटी रूपये
* ग्रामीण आरोग्य सेवेसाठी १२ हजार ०५० कोटी रूपये
* सीमावर्ती भागाच्या विकासासाठी पाचशे कोटी
* पोलिओ विरोधी मोहिमेसाठी १ हजार ०४२ कोटी रूपये
* जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निमाण अभियानासाठी ६ हजार ८६५ कोटी रूपये
* कृषी कर्जातील वाढ परिणामकाकरक
*कॉफी उत्पादनासाठी आणखी निधी
*राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी २ लाख ८० हजार कोटी रूपये
*५३ छोटे सिंचन कार्यक्रम राबविणार
*२००८-०९ मध्ये २ .८० लाखाचे कृषी कर्ज देण्याचे उद्दीष्ट
*महिला व बालकल्याण मंत्रालयाला ७ हजार २०० कोटी
*बालविकासासाठीच्या निधीत २४ टक्क्यांनी वाढ
*राष्ट्रीय फलोत्पादन विकासासाठी अकराशे कोटी
*हवामानावर आधारीत पिक विमान योजनेसाठी ५० कोटी
*एआयपीबीअंतर्गत संचिन प्रकल्पासाठी वीस हजार कोटी र ूपये
*चहा संशोधन संस्थेला वीस कोटी रूपयांची विशेष अनुदान
*मायक्रो सिंचन प्रकल्पासाठी पाचशे कोटी रूपये