Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दृष्टिक्षेपात रेल्वे बजेट

दृष्टिक्षेपात रेल्वे बजेट

वेबदुनिया

, मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (15:52 IST)
प्रवाशांसाठी सवलतींचा वर्षाव
*स्लीपर भाड्यांत पाच टक्के कपात
*एसी फर्स्ट क्लासच्या भाड्यात सात टक्के कपात
*एसी सेकंड क्लासमध्ये चार टक्के कपात
*एसी थर्ड क्लासमध्ये तीन टक्के कपात
*पन्नास किलोमीटरपुढील प्रवासासाठी सेकंड क्लासच्या भाड्यात पाच टक्के कपात
*अनुसूचित जाती व जमातीच्या तरूणांना आरक्षणापेक्षा जास्त नोकर्‍या देणार
*अशोकचक्र प्राप्त जवानांना राजधानी व शताब्दीतून मोफत प्रवासाची सवलत
*ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे प्रमाण तीस टक्क्यांहून पन्नास टक्क्यांपर्यंत
*मदर-चाईल्ड हेल्थ एक्सप्रेस लवकरच सुरू होणार
*एड्स रूग्णांना भा़ड्यात पन्नास टक्के सवलत मिळणार
*पदवीपर्यंतच्या मुलींसाठी फ्री सिझन तिकिट
* मुंबईकरासाठी 'गो मुंबई कार्ड'

नव्या गाड्या
*दहा गरीब रथ, ५३ नव्या गाड्या
*नवी दिल्ली- जम्मू तावी गाडी आता रोज
*साल्ससा अमृतसर गरीब रथ आठवड्यातून तीनदा
*बागलकोटा-जसवंतपूर गाडी रोज
*कुर्ला हावडा गाडी आठवड्यातून दोनदा
*मुंबई ते भुवनेश्वरदरम्यान आठवड्यातून दोन वेळा नवी गाडी
*पुणे-दिल्ली दरम्यान राष्ट्रकूल स्पर्धांसाठी ऑक्टोबरमध्ये विशेष गाडी
*मधुरा- लखनौ एक्सप्रेस पाटण्यापर्यंत जाणार
*वाराणसी- रांची गाडी रूरकेलामार्फत संभलपूरपर्यंत जाणार
*बंगळूर कोईमतूर गाडी एर्नाकुलमपर्यंत जाणार
*अमृतसर- कोचुवेली एक्सप्रेस आठवड्यातून तीनदा.
*अमरावती मुंबईदरम्यान आठवड्यातून दोन वेळा गाडी
*मछलीपट्टण बंगळूर नवी गाडी आठवड्यातून तीनदा.
*वाराणसी रामेश्वरम दरम्यान नवी गाडी
*खजुराहो-दिल्लीदरम्यान आठवड्यातून तीनदा गाडी
*पुरी ते दरभंगादरम्यान नवी गाडी
*इंदूर ते उदयपूरदरम्यान रतलाममार्गे आठवड्यातून तीनदा नवी गाडी
*रांची-भागलपूरदरम्यान आठवड्यातून तीनदा नवी गा़ी
*चेन्नई-सालेमदरम्यान नवी ग्डाी
*अहमदाबाद पाटण दरम्यान नवी एक्सप्रेस गाडी
*इटारसी - कटणीदरम्यान रोज गाडी

रेल्वेगाड्या, स्टेशन्समधील सुधारणा
*रेल्वेच्या सर्व फाटकांवर आता रक्षकाची उपस्थिती
*मुंबई सेंट्रल, पाटणा स्थानके आता जागतिक दर्जाची होणार
*सीसीटिव्ही कॅमेरे सर्व महत्त्वाच्या स्टेशनवर बसविणार
*सर्व रेल्वे स्टेशन्सवर टच स्क्री, रंगीत टिव्ही
*दोन वर्षांत तिकीटासाठी रांगांचे दृश्य दिसणार नाही
*१३५ स्टेशनवर उच्च दर्जाचे प्लॅटफॉर्म
*195 स्टेशनांवर ओव्हरब्रिज
*50 मोठ्या स्टेशनवर एस्केलेटर
* 2011 पर्यंत शताब्दीला नवे डबे
* 2 वर्षांत पाच हजार कंप्यूटर तिकिट काऊंटर
* काही गाड्यांत पब्लिक एक्सप्रेस सिस्टम
* 2009 पर्यंत रेल्वे कॉल सेंटर प्रत्यक्षात
* 2010 ने राजधानीमध्ये नव्या पद्दतीचे डबे
* 2009 पासून स्टील डब्यांची निर्मिती
* 2010 पर्यंत सर्व डबे स्टीलचे
* मोबाइलवर तिकिट देण्याचा विचार
* 6000 ऑटोमॅटिक मशीन लावणार
* चालत्या गा़डीतून घाण रोखण्यासाठी प्रयत्न
*सामान्यांसाठीच्या तिकीट काऊंटरचा विस्तार
*स्मार्ट कार्डने तिकीट खरेदी करता येणार
*रेल्वे कॉल सेंटर आता प्रत्यक्षात
*मेल- एक्सप्रेस गाड्यांत डिस्प्ले सुविधा
*गाडीतच आता वाहतूकीची पूर्ण माहिती
*इंटरनेटहून वेटींग लिस्ट तिकिट मिळेल

आगामी योजना
*नव्या मार्गांसाठी सतरा अब्ज रूपये खर्च करण्याचा प्रस्ताव
*१५५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग या वर्षभरात पूर्ण होणार
*बिहारमध्ये रेल्वे कॅप्टिव्ह पॉवर प्लॅंट
*रेल्वेच्या जयपूर व हुबळीच्या रूग्णालयाच्या दर्जात वाढ
*उत्तर रेल्वेचे दिल्लीतील रूग्णालयात एसी होणार
*केरळमध्ये रेल्वे कोच निर्मिती कारखाना
*स्टाफ बेनिफिट फंड २००९ पर्यंत दहा पटीने वाढण्याची अपेक्षा
*मनुष्यरहित फाटकांवर गॅंगमन थांबणार
*१६ हजार ५४८ रेल्वे ट्रॅकचे नूतनीकरण
*सर्व संवेदनशील स्टेशनांवर सुरक्षा वाढविणार
*उत्तर भारतातील आणखी काही मार्गांचे विद्युतीकरण
* 3 वर्षांत 200 दशलक्ष सीमेंट वाहतूकीचे लक्ष्य
* कंटेनर रेल्वेगाड्यांना मंजूरी
* 2000 वॅगन तयार करणार
* कंटेनर कार्पोरेशनचे आठ नवे डेपो
* पायाभूत विकासासाठी 75 हजार कोटी
* 30 स्टेशनांवर मल्टी लेव्हल पार्किंग
* कोळसा वाहतूकीसाठी नवा ट्रॅक
* ओरीसात महानदीवर दुसरा पुल
* गांधीधाम-पालनपूर मार्गावर नवे गेज
* ऑटोमॅटिक सिग्नलिंगवर भर
*रेल्वेला २५ हजार कोटींचा फायदा
*रेल्वेला तोट्यातून नफ्यात आणले
*उत्पन्न वाढविण्यावर लक्ष- लालू
*मालवाहतूकीतून २००० कोटीची कमाई
*पाच वर्षांत ६८ हजार कोटींचा फायदा
*चार वर्षांत प्रवासी भाड्यांत वाढ नाही
*प्रवासी भाड्यातून उत्पन्नात १४ टक्के वाढ
*प्रवासी गाड्यांची लांबी वाढवली
*लालूंचे हे पाचवे रेल्वे बजेट
*रेल्वे संपत्तीचा योग्य वापर केला

Share this Story:

Follow Webdunia marathi