केंद्र सरकारने यापूर्वीच शेतक्यांचे कर्ज माफ करायला हवे होते, सरकारने जर हा निर्णय आधी घेतला असता तर, अनेक शेतकर्यांचे प्राण वाचले
असते, असे सांगत उशीरा का होईना सरकारला सद्बुद्धी आल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
शेतकर्यांच्या कर्ज माफीचा सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकर्यांच्या एकजूटीचा विजय असल्याचेही ते म्हणाले.सरकाररने अल्पभूधारक शेतकर्यांचे कर्ज माफ केले असले तरी खाजगी संस्थांकडून कर्ज घेणार्या शेतकर्यांवर अजूनही टांगती तलवार असल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.