देशात गेल्या काही दिवसांमध्ये शेतकर्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली असल्याची चिंता व्यक्त करत, अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी 30 हजार
करोड रुपयांची तरतूद करण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी एका पत्राद्वारे अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याकडे केली आहे.
शेतकर्यांचा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलणे गरजेचे असून खासकरुन मध्यमवर्गीय शेतकर्यांची होणारी ससेहोलपट
थांबविण्यासाठी कर्ज माफिची तरतूद करण्याची विनंतीही पवार यांनी अर्थमंत्र्यांकडे केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून कर्जाचा बोजा असाहाय्य झाल्याने महाराष्ट्रात शेतकर्यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. तसेच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी काही दिवसापूर्वी शेतकर्यांच्या आत्महत्ये विषयी चिंता व्यक्त केली असल्याने पवार यांच्या पत्राचा आता अर्थसंकल्पात काही फायदा
शेतकर्यांना मिळतो का?, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.