रेल्वे भाड्यात आणि मालवाहतुकीच्या भाड्यात कपात करूनही आगामी आर्थिक वर्षांत वाहतुकीतून उत्पन्नात बारा टक्क्यांची वाढ होईल, अशी अपेक्षा रेल्वे अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली आहे.
वाहतुकीतून ८१ हजार ८०१ कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यात ९ हजार १४६ कोटी वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. मालवाहतुकीत १०.३८ टक्के वाढ अपेक्षित असून यातून मिळणारे उत्पन्न ५२ हजार ७०० कोटींहून ४७ हजार ७४३ कोटींवर जाण्याची अपेक्षा आहे.
लालूंनी पेट्रोल व डिझेल वाहतुकीवर पाच टक्के, फ्लाय एशवर चौदा टक्के आणि इशान्य भारतात नेल्या जाणार्या मालावर पाच टक्के भाडेकपात प्रस्तावित केली आहे.
गेल्या नऊ महिन्यातच मालवाहतुकीत आठशे कोटीने वाढ झाल्याकडे लालूंनी लक्ष वेधले. प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नातून आठ टक्के जादा उत्पन्न मिळेल, असे गृहित धरण्यात आले आहे. यामुळे उत्पन्न २० हजार ०७५ हजार कोटींवर जाण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी एसी फर्स्ट क्लासच्या भाड्यात सात टक्के, एसी सेकंड क्लासच्या भाड्यात चार टक्के आणइ सेकंड क्लासच्या भाड्यात पाच टकक्के कपात करण्यात आली आहे. चालू वर्षात प्रवासी वाहतुकीतून मिळणार्या उत्पन्नात चौदा टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.