रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये रेल्वे कारखान्यांच्या आधुनिकीकरणासाठी दोनशे कोटी रूपयांची घोषणा केली आहे.
पश्चिम बंगालमधील लिलूआ आणि पैरंबूर तसेच अजमेर येथील लोको कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रस्ताव बजेटमध्ये मांडला आहे. तसेच जमालपूरच्या रेल्वे कारखान्याचे आधुनिकीकरणासाठी 82 कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.