Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे विशेष लक्ष

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे विशेष लक्ष
केंद्रिय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी महाराष्ट्रातील शेतकरी डोळ्यासमोर ठेवून कृषी कर्ज माफ करण्याचे पॅकेज आणखी सहा महिन्यांपर्यंत वाढवले आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असणार्‍या शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जाच्या फक्त ७५ टक्केच रक्कम भरायची आहे. २५ टक्के रक्कम माफ करण्यात आली आहे. कृषी कर्ज माफ करण्याच्या विशेष योजनेंतर्गत ही सवलत देण्यात आली असून ती ३१ डिसेंबर २००९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मॉन्सून लांबल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील काही भागात खासगी सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी विशेष कृती दल स्थापण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना केंद्राच्या कृषीकर्ज माफ योजनेचा लाभ मिळत नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi