Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लष्कराला अतिरिक्त ९ हजार कोटी रूपये

लष्कराला अतिरिक्त ९ हजार कोटी रूपये
नवी दिल्ली , सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (12:55 IST)
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने संरक्षणाकडे विशेषत्वाने लक्ष पुरविल्याचे अर्थसंकल्पात दिसून येते. सरकारने संरक्षणासाठीची तरतूद यावेळी नऊ हजार कोटी रूपयांनी वाढवली आहे. एकूण तरतूद आता एक लाख १४ हजार ७०३ कोटींपर्यंत गेली आहे.

अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळत असलेले परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी म्हणाले, की मुंबईवरील हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत संरक्षण दलांना आधुनिक बनविणे गरजेचे आहे. त्यामुळे एकूण तरतुदींपैकी ५४ हजार कोटी रूपये आधुनिक साधनसामग्रीवर खर्च केला जाणार आहे.

गेल्या वर्षी सरकारने एक लाख ५६ हजार कोटी रूपये संरक्षणासाठी दिले होते. ही रक्कम एकूण सकल उत्पन्नाच्या १.९७ टक्के होती. यावेळी या सरासरीच्या आसपासच ही रक्कम आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi