'युपीए' सरकारचा हंगामी अर्थसंकल्प मांडताना काळजीवाहू अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सरकारचा 'इलेक्शन अजेंडा' जाहीर केल्याने उद्योग जगत नाराज झाले आहे. आर्थिक मंदीशी झुंज देत असलेल्या उद्योगांसाठी यात काहीही नाही, अशी त्यांची भावना आहे.
'हा अर्थसंकल्प म्हणजे अप्रासंगिक आहे. निव्वळ राजकीय आहे. यात रियालिटी वगळता इतर क्षेत्रांसाठी काहीही नाही, असे पार्श्वनाथ डेव्हलपर्सचे अध्यक्ष प्रदीप जैन सांगितले. कोटक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. मते डोळ्यासमोर ठेवून श्री. मुखर्जी यांनी बजेट मांडल्याचे कोटक म्हणाले. टीसीएसचे चीफ फायनान्शियल ऑफिसर एस. महालिंगम यांनी हे बजेट निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. सरकारने गेल्या दोन महिन्यात आर्थिक मंदीशी सामना करण्यासाठी दोन पॅकेजेस जाहीर केली होती. मात्र, सरकार त्यावर थांबल्याचे अर्थसंकल्पावर दिसून येते.
सरकारपुढे काही पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे आहे त्यात काय करता येणे शक्य ते त्यांनी केले, असे हिंदूजा ग्रुपचे सीएफओ प्रबल ब्रनर्जी म्हणाले.