Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्थसंकल्‍पात मध्‍यमवर्गीय वा-यावर

अर्थसंकल्‍पात मध्‍यमवर्गीय वा-यावर

वेबदुनिया

पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्‍या अनुपस्थितित अर्थमंत्रालयाचा कर्यभार पाहत असलेल्‍या परराष्‍ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सरकारचा शेवटचा हंगामी अर्थसंकल्‍प सादर केला. सुमारे एक लाख 17 हजार कोटी रूपयांच्‍या या बजेटकडून उद्योग जगताला मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्‍या पूर्ण होऊ शकलेल्‍या नाहीत. तर सामान्‍य माणसाच्‍या हातीही निराशा आली आहे. त्‍यामुळे बजेट सादर होताना सेन्‍सेक्‍समध्‍ये सुमारे दोनशे अंशांची घसरण झाली आहे.

आपल्‍या राजकीय कारकिर्दीत 25 वर्षात दुस-यांदा मुखर्जी बजेट सादर करीत आहेत.

जागतिक मंदीत देशाच्‍या अर्थव्यवस्थेवर कमीत कमी बोझा पाडण्‍याच्‍या प्रयत्‍नात सादर झालेल्‍या या अर्थसंकल्‍पातील प्रमुख तरतुदी अशा-

1. राष्ट्रीय महिला कोषात वाढ करून त्यास अधिक मजबूत केले जाईल.

2. अल्पसंख्यकांच्‍या उत्‍थानासाठी पंतप्रधानांच्‍या 15 कलमी कार्यक्रमाची घोषणा.

3. कर पध्‍दतीत सुधारणा करून अत्‍याधुनिक बनविली जाणार.

4. राष्ट्रीय वीमा योजनेचा 60 लाख लोकांना फायदा.

5. शिक्षण कर्जाच्‍या प्रमाणात चार पटीने वाढ

7. सार्वजनिक उद्योगांच्‍या कारभारात 84 टक्के वाढ तर नफा 74 टक्‍क्‍याने वाढला.

8. मंदीच्‍या काळात रोजगार योजना वाढविण्‍यास प्राधान्‍य.

9. सरकारकडून 37 पायाभूत प्रकल्‍पांना मंजुरी.

10. पुढील वर्षी दोन नव्‍या आयआयटी उघडणार, यंदा सहा आयआयटी सुरू करण्‍यात आल्‍या.

11. नवीन प्रकल्‍पांसाठी सरकार बँकांना मदत देणार.

12. शेतक-यांना 7.7 टक्‍के दराने तीन लाखांपर्यंतचे कर्ज योजना सुरूच ठेवणार.

13. ग्रामीण विकासाकडे अधिक लक्ष

14. 2008-09 मध्‍ये दुस-या भारत सर्वाधिक मजबूत आर्थिक व्‍यवस्‍था ठरली.

15. परदेशी गुंतवणुकीचे कायदे शिथिल केले जातील.

16. मंदीवर नियंत्रणासाठी नवीन सरकारलाही आणखी पैसे उभारावे लागणार.

17. या वर्षी विकासाचा 7.1 टक्‍के गाठण्‍याचे उद्दीष्‍ट.

18. व्‍याज दर कमी करण्‍याचे प्रयत्‍न सुरूच.

19. निर्यातीत घट येण्‍याची शक्‍यता समोर दिसते आहे. तसेच मंदीचे संकट अधिक गहीरे होण्‍याची शक्यता असली तरीही सरकार त्‍यासाठी तयार आहे.

20. औद्योगिक उत्पादन 2 टक्‍क्‍यांनी घटले आहे.

21. मागील वर्षी विकासाचा दर 7-8 टक्के ठेवण्‍याचे उद्दीष्‍ट होते. सरकारने ते साध्‍य करून 9.7 पर्यंत विकासाचा दर नेण्‍यात यश मिळविले.

22. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत बदलाची भूमिका.

23. यंदा सव्‍वा दोन कोटी टन गव्‍हाचे उत्‍पादन झाले. त्‍याचे भारतीय शेतक-यांकडे जाते.

24. उत्पादन क्षेत्रात (मेन्यूफेक्चरिंग सेक्टर) 9 टक्क्यांनी वाढली.

25. अंतर्गत गुंतवणुकीचा दर 27 टक्‍क्‍यांनी वाढला.

26. परकीय गंगाजळीत वाढ झाली आहे.

27. दरडोई उत्‍पादनात 7.4 टक्‍क्‍यांची वाढ.

28. देशाने मंदीचा सामना समाधानीरित्‍या केला. मात्र तरीही शेअर बाजारात घसरण आली.

29. महागाईचा दर वाढून 4.4 टक्के झाला.

30. संरक्षण खर्चात 1 लाख 41 हजार 703 कोटींची वाढ

31. भारत निर्माण योजनेसाठी 40 हजार कोटींची भरघोस तरतुद

Share this Story:

Follow Webdunia marathi