प्रणव मुखर्जी लोकसभेत हंगामी अर्थसकंल्प सादर करीत असतानाच एका खासदारास अचानक अस्वस्थता जाणवू लागल्याने सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी स्थगित करण्यात आले.
सभागृहात मुखर्जी यांचे भाषण सुरू असताना जनता दल (एस) चे खासदार वीरेन्द्र कुमार यांना अचानक अस्वस्थ् वाटू लागल्याने सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी स्थगित केले. त्यांना त्वरित रुग्णवाहिकेने नेण्यात आले.