लोकसभेत आज सादर झालेल्या हंगामी बजेटमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमासाठी आगामी वर्षांत १२ हजार ७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
काळजीवाहू वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी ही तरतूद करताना सांगितले, की या कार्यक्रमाचा उद्देश देशातील ग्रामीण भागात आरोग्य सेवांचा विस्तार करणे व त्यात एकजिनसीपणा आणणे हा आहे. त्यासाठी एवढा मोठा निधी त्यासाठी देत असल्याचे ते म्हणाले.