पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आल्याने त्यांच्या जागी कार्यवाह पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांना तिहेरी भूमिका साकारताना आज संसदेत हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी 25 वर्षांपूर्वी त्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे.
इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असतानाच्या काळात मुखर्जी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर त्यांना आपल्या राजकीय कारकिर्दीत दुस-यांदा ही संधी मिळाली आहे.
तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम यांच्याकडे आता गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने अर्थमंत्रालयाचा कारभार आता डॉ.मनमोहन सिंह हेच पाहत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या जागी कार्यवाह म्हणून काम पाहणा-या मुखर्जी यांना म्हणूनच अर्थमंत्री म्हणूनही भूमिका पार पाडावी लागत आहे.