राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अभिभाषणाने आज पासून बजेट सत्रास सुरुवात झाली आहे. नक्षलवादापासून ते देशातील उद्योगांपर्यंत सर्व विषयांवर या प्रसंगी पाटील यांनी मत व्यक्त केले.
2012 पर्यंत विकास दर नऊ टक्क्यांवर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. मंदीच्या काळात सरकारने केलेल्या उपाययोजनांचा चांगला फायदा झाल्याचेही त्या म्हणाल्या.
दुष्काळामुळे देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली असली तरी रबी पिकांसाठी खास उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.