आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी 2017-18चा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यात जाणून घेऊ काय महाग आणि काय स्वस्त झाले आहे.
स्वस्त - पवन चक्की, आरओ, पीओएस, पार्सल, लेदरचे सामान, सोलर पॅनल, प्राकृतिक गॅस, निकेल, बायोगॅस, नायलॉन, रेल्वे तिकिट खरेदी करणे, स्वस्त घर देण्याचा प्रयास, टॅक्समध्ये मध्यम वर्गाला राहत देण्याचा प्रयत्न, जमीन संपादन भरपाई कर-मुक्त होईल, लहान कंपन्यांना टॅक्समध्ये राहत, 50 कोटीपर्यंत वार्षिक टर्न ओव्हर असणार्या कंपन्यांना 25% टॅक्स आधी 30% होता, 2 कोटी पर्यंत टर्न ओवर असणार्या कंपन्यांवर 6% टॅक्स लागेल आधीपासून 2% कमी झाला. इन्कम टॅक्समध्ये सुटसीमा वाढवण्यात आली आहे. 3 लाखापर्यंतच्या इन्कमवर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही. 3 लाख ते 5 लाखापर्यंत इन्कमवर 5% लागेल, 5 ते 10 लाखाच्या इन्कमवर 20% टॅक्स लागेल, 10 लाखापेक्षा जास्त इन्कमवर 30% टॅक्स लागेल.
महाग - मोबाइल फोन, पान मसाला, सिगारेट, एलईडी बल्ब, चांदीच्या वस्तू, तंबाखू, हार्डवेयर, सिल्वर फॉयल, स्टीलचे सामान, ड्राय फ्रूट्स, चांदीचे दागिने, स्मार्टफोन.