Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वे अर्थसंकल्प 1 लाख 31 हजार कोटींचा

रेल्वे अर्थसंकल्प 1 लाख 31 हजार कोटींचा
या वर्षी प्रथमच मुख्य अर्थसंकल्पातून रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात आले. 2017-18 साठी रेल्वे अर्थसंकल्प 1 लाख 31 हजार कोटींचा असेल. या दरम्यान 3500 किमीचा रेल्वेमार्ग बांधण्यात येणार असून मेट्रोसाठी नवे धोरण आणण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
 
याव्यतिरिक्त आयआरसीटीसीवरून ई तिकीट बुक केल्यास सर्व्हिस चार्ज लागणार नाही. 2019 पर्यंत रेल्वेतील सर्व कोचमध्ये बायो टॉयलेट्सची सुविधा उपलब्ध होणार. अनेक रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवल्या जाणार. ही सेवा 300 स्थानकांपासून सुरू केली जाणार. 500 रेल्वे स्थानक दिव्यांग लोकांच्या सुविधेप्रमाणे तयार केले जातील.
 
पर्यटन व तीर्थयात्रांसाठी नवीन खास, गाड्या सुरू करण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एसएमएस आधारित 'क्लीन माय कोच' सेवा सुरू केली जाणार. एकूण यात्रेकरूंची सुरक्षा, स्वच्छता, विकास आणि आय वर लक्ष केंद्रित केले जाण्याची घोषणा केली गेली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मध्यप्रदेशात गॅस सिलेंडर महागले