अमृत योजनेअंतर्गत 500 शहरांना शुद्ध पिण्याचं पाणी पोहचविण्याचं लक्ष्य.
नव्या कर्मचा-यांच्या ईपीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्कम देणार.
56 हजार कोटींचा निधी अनुसुचित जातींच्या विकासासाठी मंजूर. तर अनुसुचित जमातींच्या विकासासाठी 39,135 कोटी रूपयांना निधी मंजूर.
यंदाच्या वर्षात 70 लाख रोजगार निर्मिती झाल्याचे स्वतंत्र सर्वेक्षणातून समोर आले आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील प्रकल्पांच्या प्रगतीचा पंतप्रधान स्वत: आढावा घेत असतात.
187 प्रकल्प नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत मंजूर, त्यातील 47 योजना पूर्ण झाल्या
10 कोटी गरीब कुटुंबांसाठी राष्ट्रीय आरोग्य रक्षण योजना, 50 कोटी रुग्णांना फायदा होणार
24 नवी वैद्यकीय महाविद्यालयं देशभरात उभारणार
प्रत्येकी तीन लोकसभा मतदारसंघामागे एक सरकारी वैद्यकीय रुग्णालय उभारणार, देशातल्या 24 जिल्ह्यांमध्ये प्रकल्प राबवणार
आरोग्यासाठी १.५ लाख कोटीची तरतूद
लाखो कुटुंबांना दवाखान्यातील अॅडमिशनचा खर्च खूप जास्त होतो, त्यासाठी नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम.
आयुष्यमान भारत योजना- १० कोटी गरिब कुटुंबासाठी -त्यांना ५ लाख रुपयांची दरवर्षी हॉस्पिटलायझेशनसाठी तरतूद