Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डाएटिशियन- एक करीयर

डाएटिशियन- एक करीयर
NDND
'डाएटिक्स' अर्थात आहार शास्त्रात खाण्या-पिण्या संबंधित माहिती देऊन आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, याचा अभ्यासक्रम असतो. हल्ली डाएटविषयीची जागरूकता भयंकर वाढली आहे. जनसेवा म्हणून डाएटीशियन म्हणून करीयर करण्याची चांगली संधी युवापिढीसमोर आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डाएटिंगवर लोक हजारो रुपये खर्च करत आहेत. डाएटिशियन क्लबचे सदस्य होत आहेत.

एक उत्तम डायटीशियन होण्यासाठी पदवीधर किंवा पदव्यूत्तर परीक्षा, गृहशास्त्र, न्यूट्रिशन, खाद्यशास्त्र पद्धती आदी विषय घेऊन उत्तीर्ण केली पाहिजे.

  'डाएटिक्स' अर्थात आहार शास्त्रात खाण्या-पिण्या संबंधित माहिती देऊन आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, याचा अभ्यासक्रम असतो. हल्ली डाएटविषयीची जागरूकता भयंकर वाढली आहे. जनसेवा म्हणून डाएटीशियन म्हणून करीयर करण्याची चांगली संधी युवापिढीसमोर आहे.      
डाएटिशियन एक मार्गदर्शक म्हणून काम करत असल्याने येणार्‍या प्रत्येकाच्या आरोग्याची जबाबदारी त्याच्यावर येत असते. डाएटिशियन हा लोकांच्या खाण्यापिण्यापासून तर वाईट सवयींवर देखील लक्ष ठेवतो आणि नियमित व्यायाम, प्राणायाम व दररोजच्या आहाराचे प्रमाण ठरवून देत असतो. मोठमोठ्या दवाखान्यामध्येही रूग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका डाएटिशियनची नेमणूक केलेली असते. खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्या देखील नवीन ब्रॅंड तयार करण्याआधी ज्येष्ठ डाएटिशियनचे मार्गदर्शन घेत असतात.

उमेदवाराला डाएटेटिक्स शास्त्रात पदवी घ्यायची झाली तर त्यासाठी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र व गृह शास्त्र हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उमेदवाराला बीएस्सीची पदवी देण्यात येते. त्यासोबत न्यूट्रिशन व डायटेटिक्स या विषयामध्येही बीएस्सी हा पदवी कोर्स करता येतो.

पदवीनंतर दोन वर्षांचा पदव्यूत्तर कोर्स आहे. तसेच एक वर्षांचा डिप्लोमा कोर्स देखील उपलब्ध आहे. जे उमेदवार गृहशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट व केटरींग, माइक्रोबायोलॉजी, बायोकेमेस्ट्री आदी विषयात पदवीप्राप्त आहेत. ते डाएटिशियनच्या पदवी व डिप्लोमासाठी पात्र आहेत.

एक वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये डाएटिशियन म्हणून तीन महिने प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

हैद्राबाद येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ही केंद्र सरकारची मान्यताप्राप्त संस्था कार्यरत आहे. सुरवातीला शिकाऊ डाएटीशियनला ट्रेनिंगच्या दरम्यान 5,000 रुपयापर्यंत मानधन दिले जाते. अनुभव घेतल्यानंतर उमेदवार स्वत: प्रॅक्टिस सुरू करू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi