Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खगोलशास्त्रात करियर करा.

खगोलशास्त्रात करियर करा.
खगोल शास्त्र जगातील सर्वात जुने व प्रभावी असे शास्त्र आहे. या शास्त्रात पृथ्वीच्या अंतरंगातील खनिज, लाव्हा यांच्यासह पृष्ठभागावरील नद्या, पर्वत सजीवसृष्टी सूर्य, चंद्र, आकाशगंगा, उल्का, ग्रहांची स्थिती त्यांचे नियम, निसर्ग, इतिहास व भविष्यातील त्यांच्या हालचाली या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो

खगोलशास्‍त्राच्या इतर शाखा
एके काळी भौतिकशास्‍त्राची शाखा असलेले खगोलशास्त्र हे एक स्वतंत्र शास्‍त्र म्हणून जगाच्या समोर आले असून त्याचे विविध शाखांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात एस्ट्रोफिजिक्स, एस्ट्ररोमेटेओरोलॉजी, एस्ट्ररोबायोलॉजी, एस्ट्ररोजियोलॉजी, एस्ट्ररोमेट्री व कास्मोलॉजी अशा विविध शाखा आहेत. या सर्व शाखा मिळून अवकाशातील रहस्यांचा अभ्यास केला जातो. प्रायो‍गिक तत्त्वावर त्यांना ज्योतिषाच्या ऑब्जर्वेशनल एस्ट्रोनॉमी व थिओरिटिकल एस्ट्रोफिजिक्स या रुपात विभाजित करण्यात आले आहे. ऑब्जर्वेशनल एस्ट्रोनॉमीचा संबंध टेलीस्कोप, दुर्बिण तसेच कॅमेरा यांचा उपयोग ग्रहांना पाहण्यासाठी व विविध प्रकारची उपकरणे तयार करण्यासाठी केला जातो.

खगोलशास्त्रज्ञांची वाढती मागणी
ज्या युवकांना अवकाशातील रहस्ये जाणून घेण्याची तसेच त्यात करियर घडवायची इच्छा आहे त्यांच्यासाठी यात भरपूर संधी आहेत. खगोलशास्त्रज्ञांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या क्षेत्रात करियर करणार्‍यांना भौतिकशास्त्रात रूची असणे आवश्यक आहे. खगोलशास्त्र एक व्यापक क्षेत्र आहे. या शास्‍त्रांच्या विविध शाखा असून युवकांना त्यांच्या आवडीनुसार शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. खगोलशास्त्रात करीयर करणारे विद्यार्थी ही या क्षेत्रात राहून देशाची सेवा करू शकतात.

व्यक्तिगत कौशल्य
खगोलशास्‍त्रज्ञ होण्यासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, जिद्द व चिकाटी आवश्यक आहे. बुद्धिमत्ता, कल्पनाशीलता, समस्यांशी संघर्ष या कौशल्याने विद्यार्थी निपुण असला पाहिजे. तसेच तो विद्यार्थी गणित व संगणक शास्त्रातील किडा पाहिजे. या क्षेत्रात कमी वेळेत जास्त व अचूक काम केले जाते. त्यामुळे वेळेचे बंधन पाळणे येथे अत्यंत गरजेचे असते. अतिशय चाणाक्ष बुद्धिमत्तेसोबत विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शकाकडून सांगितले जाणारा विषय त्वरीत आकलन करून तो विषय विविध भाषांमध्ये रूपांतरीत करून इतर ठिकाणी पाठविता आला पाहिजे.

ग्लोबल कार्यक्षेत्र
एस्ट्रानामरचे मुख्य कार्य संशोधनावर आधारित असते. त्यामुळे त्याला सतत फिरावे लागते. त्यांचे काम हे निरिक्षण करणे व उपग्रहापासून मिळणारे सांकेतिक संदेश प्राप्‍त करून संबंधित वेधशाळेला ते पाठविले गेले पाहिजेत. तसेच उपग्रहाच्या कम्युनिकेशनमध्ये काही अडथळा निर्माण झाला असेल तर तो दुरूस्त करणे. पीएचडी होल्डर त्यांच्या करियरला 'पोस्टडाक्टरेट रिसर्च'पासून आरंभ करतात. त्याचबरोबर विषयांच्या अभ्यासाच्या आधारावर ते 'ऑब्जर्वेशनल एस्ट्रोनामर', 'स्टेलर एस्ट्रोनामर्स' व 'सोलर एस्ट्रोनामर्स' या पदावर ही काम करू शकतात. पीएचडी करणारे युवक कॉलेज अथवा विद्यापीठात शिक्षण घेत असताना 'बेसीक रिसर्च डेव्हलपमेंट'मध्ये करियर करू शकतात. पदवीधर विद्यार्थी 'एप्लाइड सिर्च व डेव्हलपमेंट' या महत्त्वपूर्ण क्षेत्रात करीयर घडवू शकतात. या क्षेत्रात बॅचलर डिग्री धारण करणारा विद्यार्थी 'टेक्नीशियन', 'रिसर्च असिस्टेट' म्हणून करियरला सुरवात करू शकतो. या क्षेत्रात काम करणार्‍यांना सरकारी कार्यालये, संरक्षण मंत्रालय, अवकाश संशोधन संस्था आदी सरकारी विभागात सहज नोकरी मिळू शकते.

पात्रता
'खगोलशास्त्रज्ञ' होण्यासाठी डाक्टरेट डिग्री आवश्यक असते. कारण याचा संबंध संशोधन व विकास विभागाशी असतो. ज्या विद्यार्थ्यांला यात प्रवेश घ्यायचा असेल तो पीसाएम विषयांच्या ग्रुपसह 12 वी उत्तीर्ण पाहिजे. थिओरिटिकल अथवा ऑब्जर्वेशनल एस्ट्रोनॉमीमध्ये करीयर करण्यासाठी बारावीत विज्ञान शाखा हवी. बारावी उत्तीर्ण केल्यानंतर गणित व भौतिकशास्त्रात पदवी घेऊ शकतात. तसेच याच विषयांमध्ये मास्टर डिग्री केल्यानंतर एस्ट्रोनॉमीमध्ये स्पेशलाइजेशनपासून तर पीएचडी करता येऊ शकते. पीएचडी केल्यानंतर अवकाश शास्त्रज्ञ, अंतराळवीर, एस्ट्रोफिजिसिस्ट किंवा अंतराळ वैज्ञानिक तसेच संशोधन अधिकारी होण्याचा मार्ग खुला होतो. रिसर्च करण्यासाठी पीएचडी अनिवार्य असून प्रविष्ट विद्यार्थ्यांना ज्वाइंट एंन्ट्रस् स्क्रीनिंग टेस्ट देणे आवश्यक आहे. इस्ट्रूमेंटेशन व एक्सपेरिमेंटल एस्ट्रोनॉमीमध्ये करियर करण्यासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल कम्युनिकेशनमध्ये बीई अथवा बीटेक केल्यानंतर या क्षेत्रासह रिसर्च क्लॉलरमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.

भारतातील प्रमुख संस्थांची नावे-
1. आर्यभट्ट रिसर्च इंस्टिट्युट ऑफ ऑब्जर्वेशनल
सायंसेस, मनोरा पार्क नैनिताल 263 129.
2. हरिश्चचंद्र रिसर्च इंस्टिट्यु
छटांग रोड, झुसी अलाहाबाद 211 019.
3. इंडियन इंस्टिट्युट ऑफ एस्ट्रोफिजिक्स, सेकंड ब्लॉक
कोरामंगला, बेंगलोर 560 034
4. इंडियन इंस्टिट्युट ऑफ जियोमेग्नेटिज्म, कळंबोली हायव
न्यू पनवेल, नवी मुंबई 410 218
5. इंटर यूनिवसिर्टी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्
पोस्ट बॉक्स नं 4 गणेशखिंड पुणे. 411 007.
6. नॅशनल सेंटर फॉर रेडियो एस्ट्रोफिजिक्स, टाटा इंस्टिट्युट
ऑफ फण्डामेंटल रिसर्च पोस्ट बॉक्स नं.4 गणेशखिंड पुणे. 411 007.
7. उस्मानिया यूनिवर्सिटी, हैद्राबाद 500 007.
8. फिजिकल रिसर्च लॅब्रोटरी, नवरंगपुर अहमदाबाद. 380 009
9. स्वामी रामतीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी
ध्यानतीर्थ गौतमी नगर विष्णूपुरी नांदेड 431 606
10. इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायंस बेंगलोर

Share this Story:

Follow Webdunia marathi