Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गेम डिझायनिंगमध्ये करियर

गेम डिझायनिंगमध्ये करियर
ND
काही वर्षांपासून करियरच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे गेम डिझायनिंग. कॉम्प्युटर, मोबाईल, व्हिडिओ गेम्स, सीडी प्लेयरमध्ये असणारे खेळ मुलांबरोबर मोठ्यांनाही आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. त्यामुळे तरुणांना गेम डिझायनिंगमध्ये करियरची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

व्हिडिओ गेम्सची लोकप्रियता वाढल्याने लहान लहान गावांमध्येसुद्धा सायबर कॅफेत व्हिडिओ गेम्सचे चाहते दिसू लागले आहेत.

गेम डिझायनिंग आहे तरी काय?
गेम डिझायनिंग म्हणजे कम्प्युटरवर खेळ तयार करणे. विविध एंटरटेनमेंट डिव्हाइसमध्ये ते वापरले जातात. पीसी व ऑनलाईन गेम आपल्याला माहितीच आहेत. शिवाय मोबाईलवरसुद्धा ही सुविधा उपलब्ध झाली आहे. करियरच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रात भरपूर संधी आहेत.

हे क्षेत्र वेगाने विस्तारत असून त्यात संधी खूप आहेत. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर एण्ड सर्व्हिस कंपनीच्या आकडेवारीनुसार वर्ष 2010 पर्यंत भारतात गेमिंगचा व्यवसाय किमान 10 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेमिंग करीयरमध्ये मनोरंजनासोबत चांगला पैसासुद्धा कमावता येतो.

गेम डेव्हलपमेंट ही एक जटिल प्रक्रिया आहे. याचे मुख्य प्रकार म्हणजे डिझाइन, प्रोग्रॅमिंगं, आर्ट वर्क, कंटेन्स क्रिएशन व टेस्टिंग आहे. त्यासाठी कल्पकता, प्रतिभा व अनुभव यांची गरज लागते. या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर उज्ज्वल भविष्याचा पाया तुम्ही रचू शकता.

आर्टिस्ट
कुठल्याही गेममध्ये लोकांची आवड निर्माण करण्यासाठी ग्राफिक डिझायनिंगची मुख्य भूमिका असते. या क्षेत्रात आर्ट डायरेक्टर, कॉन्सेप्ट आर्टिस्ट, कॅरेक्टर मॉडलर, कॅरेक्टर एनिमेटर, एनवॉयरनमेंटल 3 डी आर्टिस्ट, इफेक्ट्स आर्टिस्ट इत्यादीच्या रूपात करियरला एक नवीन दिशा मिळू शकते. गेमिंग इंडस्ट्रीमध्ये आर्टिस्टच्या रूपात करियर करविण्यासाठी फाईन आर्ट्स किंवा याच्या समकक्ष डिग्री घेणे गरजेचे आहे.

गेम डिझायनर
गेम डिझायनर कुठल्याही खेळाचे ब्ल्यू प्रिंट तयार करतो आणि त्याला प्रत्यक्षात आणतो. टीममध्ये गेम डिझायनरची वेगळी जागा असते, जसे - लेवर डिझायनर्स, राइटर-डिझायनर्स, लीड गेम डिझायनर इत्यादी. एनिमेशन इंडस्ट्रीमध्ये प्रोड्यूसरचे काम महत्त्वाचे असते. कारण त्याच्यावर प्रत्येक कामाची जबाबदारी असते. प्रोड्यूसरसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंटची हाताळणी गरजेचे असते.

प्रोग्रॅमर
कुठलीही गेमिंग टीम प्रोग्रॅमरशिवाय अपुरी असते. डिझायनर, प्रोड्यूसर, साउंड आर्टिस्ट इत्यादींच्या कामाला स्वरूप देणारा असतो प्रोग्रॅमर. प्रोग्रॅमर त्याच्या प्रत्येक कल्पनेला कॉम्प्युटर अनुरूप मेथेमेटिकल स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी गणिताचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर सी, सी ++, जावा, डायरेक्ट एक्स सारख्या काही प्रोगामिंग लँग्वेजचे ज्ञान असणेसुद्धा आवश्यक आहे.

वेतन
गेम डिझायनर्सला 10 हजारापासून तर 20 हजारापर्यंत प्रती महिना वेतन मिळू शकते. नंतर अनुभवाच्या आधारे 50 ते 60 हजार रुपये प्रती महिना पगार मिळतो.

अभ्यासक्रम शिकवणार्‍या संस्था

गेमिंगपासून संलग्न पाठ्यक्रमाची अभ्यासाची सुविधा इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर, आयआयटी, पवई मुंबई आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबादमध्ये उपलब्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi