Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्योतिषशास्त्रात करा करिअर

ज्योतिषशास्त्रात करा करिअर

वेबदुनिया

WD
ग्रहांना जाणून घेण्याची प्राचीन कला म्हणजे ज्योतिष, गणितिय गणना म्हणजे ऋषी-मुनींनी मिळविलेले एक पदत्त ज्ञान आहे. व्यक्तीला त्याच्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचे ज्ञान हाच या ज्योतिषचा सर्वात मोठा फायदा आहे. त्यामुळे सावध होवून सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करतो आणि विपरीत परिस्थितीतही त्याला सावरण्याचे बळ मिळते. पृथ्वीपासून कित्येक प्रकाशवर्ष दूर असलेल्या ग्रहांचा मानवावर काय प्रभाव पडेल याचा अभ्यास ज्योतिषमध्ये करण्यात आला आहे. कोणता ग्रह त्याच्यावर चांगला प्रभाव टाकेल आणि कोणता वाईट याचे ज्ञान ज्योतिषद्वारे मिळू शकते.

प्रत्येक ग्रहाचे त्याचे एक तत्व आहे. त्या तत्वानुसार त्या ग्रहाच्या वाईट प्रभावाला संपुष्टात आणले जावू शकते. वर्तमान परिस्थितीत ज्योतिष ऐक करिअरच्या रूपात प्रगती करू लागले आहे. त्यात संगणकीय ज्योतिषाची भर पडल्यामुळे सर्व सहज आणि फटाफट शक्य होवू लागले आहे. कितीही श्रीमंत आणि गरीबातला गरीब असलातरी तो काही अंशी ज्योतिषला मानत असल्यामुळे आज ज्योतिषला चांगले दिवस आहेत. भारतात ज्योतिषशी संबंधीत जवळपास 1800 वेबसाइट्‍स आहेत. पाश्चात्य देशही यात मागे नाहीत. विदेशातही 2 लाखाच्या जवळपास ज्योतिषशी संबंधित वेबसाइट्स आहेत. नवयुवकांनी जर ज्योतिषचा गांभीर्याने अभ्यास केला तर ते यात चांगले करियर बनवू शकतात.

वर्तमान परिस्थितीत ज्योतिष एक चांगले करिअरच्या रूपात समोर आले आहे. या प्राचीन भारतीय विद्येला जाणून-समजून घेण्यास युवावर्ग उस्तुक दिसत आहे. तरी या विद्येला पूर्णपणे समजून घेणार्‍यांची भारतात बरीच कमतरता आहे. ज्योतिषचे दोन प्रकार आहेत. 1) सिद्धांत ज्योतिष 2) फलित ज्योतिष. सिद्धांत ज्योतिष अंतर्गत पंचांग इत्यादिचा समावेश होतो. याचे अध्ययन करून युवावर्ग स्वयंरोजगार सुरू करू शकतात. इतकेच काहीतर दुसर्‍यालाही रोजगार देवू शकतात. फलित ज्योतिष अंतर्गत भविष्य पहाणे, पत्रिका बनविणे, ग्रहजन्य पीडा आणि निदान इत्यादीचे अध्ययन केले जाते.

ज्योतिषमध्ये आवड असणारे युवक ज्योतिषमध्ये डिप्लोमा करू शकतात. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही विषयात पदवी अभ्यास करीत असताना याचाही डिप्लोमा मिळवू शकता. या डिप्लोमा कोर्स तीन वर्षाचा आहे. पहिल्या वर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. दुसर्‍या वर्षी डिप्लोमा आणि तिसर्‍या वर्षी अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा असतो.

हे युवकांसाठी प्रगतीशिल फिल्ड आहे. ज्योतिषाबरोबर अध्यात्मीकतेशी संबंध असणे तर गरजेचे आहेत सोबत ज्योतिषचे काम करताना खोटी आश्वासने, कपट, लालच, व्यसन इत्यादी दुर्गुणांपासून दूर राहणे आवश्यक आहे. कोणाचीही फसवणूक होईल अशी वागणूक केल्यास विश्वासार्हता गमावल्याने त्याचा विपरित परिणाम करिअरवर होण्याची दाट शक्यता आहे. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा, सात्विकता आणि जनसेवेचा भाव असणे अत्यंत आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi