Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पर्यटनमध्ये उज्ज्वल करियर बनवा!

पर्यटनमध्ये उज्ज्वल करियर बनवा!
PRPR
ग्लोबलायझेशनच्या काळात जग हेच एक गाव बनले आहे. देशांतर करणे आता सोपे झाले आहे. म्हणूनच फिरायला जायचे असले की लोक सहजगत्या परदेशात जातात. दिवसभरात कितीतरी पर्यटक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असतात. भारतात पर्यटनाचे प्रमाणही मोठे आहे. जागतिक पर्यटन उद्योगात भारताचा तिसरा क्रमांक आहे. त्यामुळे यात करीयरचीही संधी आहे.

या करियरमध्ये खास काय आहे?
भारतात पर्यटन उद्योगाचे क्षेत्र विस्तृत आहे. त्यात सरकारी टूरिझम डिपार्टमेंट, इमिग्रेशन आणि कस्टम सर्विसेस, ट्रॅव्हल एजेंसीज, टूर ऑपरेटर्स, एयरलाइन्स आणि हॉटेल इत्यादी क्षेत्रांना सामील केले आहे. त्याचबरोबर याच्याशी निगडित उद्योग उदा. एयरलाइन्स कॅटरिंग, लांड्री सर्विसेस, गाइड, टुरिझम प्रमोशन आणि सेल इत्यादींना सामील केले आहे. त्याव्यतिरिक्त तीर्थ-यात्रा आणि अडवेंचर्स टुरिझमची एक वेगळीच शाखा आहे, त्यात लोकांना टूर पॅकेजच्या माध्यमाने सेवा देण्यात येते. या क्षेत्रात तुम्ही तुमच्या योग्यता व अनुभवाच्या आधारावर लहान स्तरापासून सुरू करून मोठ्या स्तरावर जाऊ शकता.

पात्रता :
पर्यटन संबंधित अभ्यासक्रम देशभरात सरकारी आणि गैर सरकारी दोन्ही क्षेत्रात आहेत. देशात किमान 30 पेक्षा जास्त महाविद्यालये आणि 100 पेक्षा जास्त सरकारी व गैर सरकारी संस्थांतून हा अभ्यासक्रम चालवण्यात येत आहे. मुख्य 3 प्रकारचे अभ्यासक्रम आहेत - सर्टिफिकेट, डिप्लोमा व डिग्री कोर्स. या अभ्यासक्रमाला दोन भागात विभाजित केले आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्स आणि दुसरा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स.

अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी हायर सेकंडरी परीक्षा उत्तीर्ण करणे जरूरी आहे. पी. जी. पाठ्यक्रमासाठी उमेदवाराला स्नातक होणे आवश्यक आहे. या विभागात प्रवेश मिळवण्यासाठी आधी लिखित परीक्षा होते त्यानंतर साक्षात्कार व ग्रुप डिस्कशनच्या माध्यमाने प्रवेश मिळतो. तुम्हाला एखादी विदेशी भाषा येत असेल तर ती तुमच्यासाठी विशेष पात्रता आहे. त्या आधारे तुम्हाला प्राधान्य देण्यात येते.

नोकरीची संधी-
हा अभ्यासक्रम केल्यानंतर सरकारी व खासगी दोन्ही क्षेत्रात नोकरीची संधी असते. उच्च शिक्षिताना ट्रॅव्हल एजेंसीज, टूर ऑपरेटर्स, हॉटेल, एयरलाइंस व कार्गो कंपन्यांत चांगली संधी मिळू शकते.

पगार -
तुमचे कम्युनिकेशन स्किल चांगले असेल, प्रेझेंटेशन चांगले असेल, लोकांना भेटण्याची आवड आणि विभिन्न जागेची माहिती व विपरीत परिस्थितींमध्ये काम करण्याची कला असेल तर तुम्ही या क्षेत्रात 5 हजारापासून ते अगदी 30 हजारापर्यंत किंवा जास्तही पगार मिळवू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क :
1. दिल्ली विश्वविद्यालय, दिल्ली, वेबसाइट www.wu.ac.in
2. पांडिचेरी विश्वविद्यालय, पांडिचेरी, वेबसाइट www.pondiuni.edu.in
3. अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालय, अलीगढ www.amu.ac.in
4. कुरुक्षेत्र विश्वविद्यालय, कुरुक्षेत्र, वेबसाइट www.kukinfo.com
5. जय नारायण व्यास विश्वविद्यालय, जोधपुर, वेबसाइट www.jnvu.edu.in
6. इंदिरा गांधी नॅशनल विश्वविद्यालय, दिल्ली, वेबसाइट www.ignou.ac.in
7. जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालय, दिल्ली, वेबसाइट www.jmi.ac.in
8. मुंबई विश्वविद्यालय, मुंबई, वेबसाइट www.mu.ac.in

Share this Story:

Follow Webdunia marathi