Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फॅशन, इमेज स्टायलिंगमध्ये करीयर

फॅशन, इमेज स्टायलिंगमध्ये करीयर
IFMIFM
आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसले पाहिजे यासाठी हल्ली प्रत्येकजण धडपड करताना दिसतो. आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आपण इतरावर कशी छाप पाडू शकतो यासाठी प्रत्येकजण स्टायलिश रहाण्याचा प्रयत्न करत आहे. फॅशन व इमेज स्टायलिस्टस्कडून आपल्या रंगरूपात अपेक्षित बदल घडवून आणत आहेत. समाजातील नागरिकांच्या रंगरूपात बदल करण्यासाठी फॅशन, इमेज स्टायलिंगच्या करियरचा जन्म झाला आहे, असे म्हणणे गैर ठरणार नाही.

webdunia
IFMIFM
बॉलीवूड व हॉलिवूडमधील सिनेतारका त्यांच्या चाहत्यासमोर येण्यापूर्वी त्यांच्यातील कमतरता लपवून व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्यासाठी फॅशन स्टायलिस्टस व इमेज कंसल्टंटस यांचा सल्ला घेतात. फॅशन स्टायलिस्टस व इमेज कन्सल्टंटस यांचे कार्य केवळ सिनेतारकांना सल्ला दिला म्हणजे थांबत नाही. ती त्यांची करियरची पहिली पायरी असते. आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी कुठकुठल्या गोष्टी पूरक आहेत, त्यासाठी कुठली उपाययोजना केली पाहिजे, त्याचे नियोजन अशा विविध गोष्टीचा आराखडा तयार करून हेअर स्टाइल, ड्रेसिंग इमेज यांची काळजी घ्यावी लागते. बॉलीवूडमधील ग्लॅमर जवळून पाहण्याची इच्छा असणार्‍यांना फॅशन स्टायलिस्टस व इमेज कंसल्टंटस म्हणून करियर करण्याची सुवर्णसंधी आहे.
webdunia
IFMIFM


हायर डिप्लोमा इन फॅशन स्टाइलिंग एण्ड इमेज डिझाइनची (एफएसआईडी) पदवी संपादन करून या क्षेत्रातील उत्तम करियरचे कौशल्य मिळवू शकतो. जगभरातील विविध संस्कृतीनुसार सिनेतारकांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पारंपरिक तसेच फॅशनेबल शृंगार करून त्यांची चाहत्यामध्ये इमेज निर्माण करण्याचा सिंहाचा वाटा फॅशन स्टाईलिस्टस व इमेज कंसल्टंटसचाच असतो.
webdunia
IFMIFM


या व्यतिरिक्त करीयरला पर्याय म्हणून मेकअप, हेअर स्टायलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीमध्ये प्राविण्य मिळवू शकतो. या संबंधित विषयाचे व्यापक स्वरूपात मार्गदर्शन व प्रात्याक्षित दिले जाते. क्लाइंट अ इंप्लॉयर्स यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी संवाद कौशल्याचे धडे दिले जातात. इमेज एण्ड फॅशन स्टायलिंग इंडस्ट्री भारतात काय तर परदेशात देखील झपाट्याने विकास पावत आहे. या नवीन व आकर्षक क्षेत्रात करियर करण्यासाठी युवक- युवतींना मोठी संधी उपलब्ध आहे.

हायर डिप्लोमा इन फॅशन स्टाइलिंग एण्ड इमेज डिझाइन(एफएसआईडी) या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी उमेदवार विज्ञान शाखेत
12 वीची (50 टक्के) परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. तीन वर्षांचा या कोर्सचा कालावधी असून हा कोर्स नवी दिल्ली येथील पर्ल
अकादमी ऑफ फॅशन या संस्थेत उपलब्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi