र-
फोटोग्राफी क्षेत्रात फॅशन फोटॉग्राफीची मोठी क्रेझ आहे. फॅशन क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. स्मार्ट वर्क आणि चांगली मिळकत तसेच स्वत:चे नाव होण्यासाठी तरूण-तरूणी मोठ्या संख्येने 'फॅशन फोटोग्राफी' हे क्षेत्र करियर म्हणून निवडतात. मॉडेलिंगच्या क्षेत्रातील जाहिरात एजन्सी व फॅशन स्टुडिओमध्ये कुशल फोटॉग्राफरची नेहमी आवश्यकता भासत असते. फॅशन फोटॉग्राफरला मुंबई व दिल्ली सारख्या मोठ्या शहरातच जास्त कामे मिळत असतात. तसेच फॅशन हाउस, डिझायनर, फॅशन जर्नल्स, वर्तमानपत्रे, खाजगी वाहिनी येथेही फॅशन फोटॉग्राफरला संधी मिळत असते.
याचप्रमाणे पोर्टेट किंवा वेडींग फोटॉग्राफी, नेचर व वाईल्डलाईफ फोटॉग्राफी, फॉरेंन्सिक फोटॉग्राफी, डिजिटल फोटॉग्राफी, फाईन आर्ट्स फोटॉग्राफी, ट्यूरिष्ट फोटोग्राफी या विविध प्रकारातही आपल्याला करियर करता येते.