ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येते. संगीत एक अशी प्रक्रिया आहे की, तिच्या माध्यमातून मानवी भावनांना सृजनात्मक रूप दिले जाऊ शकते. संगीतच आपल्या मनाला तसेच मेंदूला आनंद प्रदान करीत असते. जगात असा एकही व्यक्ती नसेल की त्यांला संगीत आवडत नसेल. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. त्यामुळे भारतीयांचे संगीताशी आगळेवेगळे नाते जुळले आहे. भारतीय संगीताची परंपरा जगातली सर्वांत जुनी व महान आहे. ती आजही कायम असून संगीताला बकुळीच्या फुलाप्रमाणे जपण्यात आले आहे. तानसेनपासून तर गानकोकिळा लता मंगेशकर त्यांच्या कलाविष्काराने ते अधिक समृध्द झाले आहे. भारतीय संगीत गायन, वादन व नृत्य यांचा संगम आहे. भारतीय संगीत राग व ताल यांच्यावर आधारित आहे. त्यात लय व माधुर्याचा रंग भरण्याचे काम गायक करत असतात. प्रतिभा, अभिरुचि व परिश्रम घेणार्या उमेदवारांना संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. काही व्यक्तींना मिळालेला सुमधुर आवाज तर परमेश्वराकडून मिळालेली देणगीच असते. मात्र, या दिशेने करियरची वाटचाल सुरू करण्यासाठी भरपूर अभ्यास व सरावाची आवश्यकता असते. कुठल्याही संगीत महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे ही करियरची पहिली पायरी आहे. आपल्यासाठी संगीतात करियर करणे काही कठीण नाही, असा आत्मविश्वास या क्षेत्रात पाऊल ठेवणार्या उमेदवाराला असला पाहिजे. यासोबत या क्षेत्रातील लोकांशी संपर्क, प्रशिक्षण तसेच व्यावसायिक रूपात लोकप्रिय होण्यासाठी आपली डेमो सीडी तयार करण्यासाठी आपल्याकडे भांडवल ही असणे गरजेचे आहे. विविध प्रकारात संगीताचे विभाजन करण्यात आले आहे. त्यात शास्त्रीय संगीत, लोक संगीत, जॉझ, पॉप, फ्यूजन अशा विविध शाखा आहेत. त्याच पध्दतीने या विविध शाखांमध्ये स्वतंत्र करीयर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. |
भारतीय संगीताची परंपरा जगातली सर्वांत जुनी व महान आहे. ती आजही कायम असून संगीताला बकुळीच्या फुलाप्रमाणे जपण्यात आले आहे. तानसेनपासून तर गानकोकिळा लता मंगेशकर त्यांच्या कलाविष्काराने ते अधिक समृध्द झाले आहे. |
|
|
गायक किंवा वादक होण्याव्यतिरिक्त या क्षेत्रात कम्पोजर, प्रशिक्षक, गीतकार, म्युझिक पब्लिशर, म्युझिक जर्नालिस्ट, डिस्क जॉकी, म्युझिक थेरेपिस्ट, आर्टिस्ट तसेच संगीत कंपन्यांचे जनसंपर्क अधिकारी असे करीयरचे विविध पर्याय उपलब्ध असतात. म्युझिक चॅनल्सची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता व कार्यक्रमांना कार्पोरेट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात दिले जाणारे प्रायोजकत्व, यामुळे संगीत क्षेत्रात करीयर करण्याकडे उमेदवारांचा कल वाढत आहे.
शैक्षणिक पात्रता-
संगीत क्षेत्रात करियर करत असताना कुठली विशेष शैक्षणिक योग्यतेची आवश्यकता नसते. तरी देखील कुठल्याही संगीत महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी दहावी (10+2) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संगीत क्षेत्रात सर्टिफिकेट कोर्स, बॅचलर डिग्री, डिप्लोमा कोर्स तसेच पोस्ट ग्रेजुएट कोर्स उपलब्ध आहे. सर्टिफिकेट कोर्सचा कालवधी एक वर्ष, बॅचलर डिग्रीचा तीन वर्ष तर डिप्लोमा व पोस्ट ग्रेजुएट कोर्सचा दोन वर्षे आहे.
संगीत विषयाचे शिक्षण व प्रशिक्षण विविध संस्थामधून दिले जाते. भारतात मद्रास येथील कलाक्षेत्र व दिल्ली येथील भारतीय कला केंद्र, या संस्था संगीत क्षेत्रातील नामांकित संस्था आहेत.
संगीत विषयाचा अभ्यासक्रम-
* बी.ए. ऑनर्स म्युझिक
* बी.ए. व्हिज्युअल आर्ट/ म्युझिक / डांस व ड्रामा
* बी.ए. म्युझिक
* बी.ए. तबला
* बी.एफ.ए तबला
* सर्टिफिकेट कोर्स अन म्युझिक
* म्युझिक डिग्री
* म्युझिक डिप्लोमा
* सितार डिप्लोमा
* तबला डिप्लोमा
* एम.एस इन म्युझिक
* एम.फिल इन म्युझिक
* पीएचडी इन म्युझिक
* अंडरग्रॅज्युएट डिप्लोमा इन म्युझिक
महाराष्ट्रातील संगीत संस्था-
1) गांधर्व संगीत महाविद्यालय मिरज, जि. सांगली
2) संगीत विभाग, ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ परिसर, गणेश खिंड, पुणे.
3) संगीत विभाग, एस. एन. डी. टी. महाविद्यालय, मुंबई.
4) संगीत विभाग, एस. एम. आर. के महाविद्यालय, नाशिक.
5) संगीत विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
मध्यप्रदेशातील संगीत संस्था-
1) सिलाम्बम, पद्मा एस. राघवन बी 2, 49, एमआईजी कॉलनी, संजय उपवन, इंदौर.
2) कला पद्मा भरतनाट्यम डांस अकॅडमी, शंकर होमबाल, 185, कल्पना नगर, रायसेन रोड, भोपाल.
3) नृत्यायन लता सिंग, एमआईजी, 69, कोटरा सुल्तानाबाद, भोपाल
4) इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, खैरागढ़
5) अवधेश प्रतापसिंग विश्वविद्यालय, रीवा
6) बरकतुल्ला विश्वविद्यालय, होशंगाबाद रोड, भोपाल
7) देवी अहिल्या विश्वविद्यालय, नालंदा परिसर, 169, रवींद्रनाथ टागोर मार्ग, इंदौर
8) डॉ. हरिसिंह गौर विश्वविद्यालय, सागर
9) महात्मा गांधी ग्रामोदय विश्वविद्यालय, सतना
10) राणी दुर्गावती विश्वविद्यालय, जबलपूर
11) आदर्श कला मंदिर, ग्वाल्हेर
12) आनंद म्युझिक कॉलेज, राजबाड़ा, धार
13) भारतीय संगीत महाविद्यालय, ग्वाल्हेर
14) शासकीय संगीत महाविद्यालय, मैहर
15) शासकीय माधव संगीत महाविद्याय, उज्जैन