Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीईटी प्रवेश प्रक्रिया 18 जुलैपासून

सीईटी प्रवेश प्रक्रिया 18 जुलैपासून
, बुधवार, 16 जुलै 2014 (10:51 IST)
राज्यातील मेडिकल सीईटी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आता या प्रवेश प्रक्रियातील दुसरा कौंसिलिंग राऊंड आणि पसंतीक्रम अर्जाची प्रक्रिया 18 जुलैपासून सुरू होत आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून 23 जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या विभागीय केंद्रावर विध्यार्थ्यांना पसंतिक्रम अर्ज भरता येतील.

सीईटी परीक्षेच्या निकालानंतर समुपदेशन आणि पसंतीक्रम अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार दुसर्‍या सत्रात समुपदेशन आणि पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया 18 जुलैपासून सुरू होत आहे. ग्रँट मेडिकल कॉलेज, भायखळा मुंबई विभागीय केंद्र, पुणे येथे बी.जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, औरंगाबाद गव्हर्नमेंट कॉलेज आणि नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजामध्ये विध्यार्थ्यांकडून पसंतिक्रम अर्ज भरून घेण्यात येतील.

18 जुलै रोजी सकाळच्या 9 वाजताच्या सत्रात 1 ते 5000 आणि दुपारच्या 2 वाजताच्या सत्रात 5001 ते 6500 एसएमएल नंबरच्या विध्यार्थ्यांच्या पसंतिक्रम अर्जाची प्रक्रिया पार पडेल. 19 जुलै रोजी 6501 ते 8500 सकाळच्या सत्रात आणि 8501 ते 1100 एसएमएल नंबरच्या विध्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात पसंतिक्रमाची प्रक्रिया पार पाडता येईल. तसंच 2, ते 23 जुलैपर्यंत पसंतिक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून याबाबतचे वेळापत्रक वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi