Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सौंदर्य उद्योगात करीयर करू इच्छिणां-यांसाठी दोन महिन्यांच्या कोर्सचे आयोजन

सौंदर्य उद्योगात करीयर करू इच्छिणां-यांसाठी दोन महिन्यांच्या कोर्सचे आयोजन
मुंबई , शनिवार, 23 एप्रिल 2016 (17:09 IST)
विद्यार्थ्यांना सौंदर्य उद्योगामध्ये / ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करीयर घडवण्यास मदत करण्याच्या हेतूने इंडियन फॅशन अकॅडमीने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये २ महिन्यांच्या ब्युटी कोर्सचे आयोजन केले आहे. या कोर्समध्ये त्वचा, मेकअप आणि इलेक्ट्रो थेरपीचे शिक्षण दिले जाणार आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकरण अभ्यासांच्या सहाय्याने त्वचाशास्त्र सखोलपणे समजून घेऊन मशिनद्वारा दिली जाणारी ट्रीटमेण्ट कशी हाताळावी यांचे विशेष प्रशिक्षणही जाणार आहे. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्याना सौंदर्य उद्योगातील अनेक पैलुंची, क्षेत्रांची व घटकांची माहिती देऊन, विद्यार्थ्याला त्याचे करीयर निवडण्यास लागणारा एक सर्वसमावेशक दृष्टीकोन मिळेल.
 
विख्यात सौंदर्यतज्ज्ञ आणि इंडियन फॅशन अकॅडमीच्या सीईओ श्रीमती राखी राठोड म्हणाल्या, "आम्ही स्वतः या विद्यार्थ्यांना या कोर्सचे शिक्षण देणार आहोत. या कोर्समध्ये त्वचेच्या ट्रीटमेण्टकरिता वापरली जाणारी वेगवेगळी तंत्रे आणि तंत्रज्ञाने यांचे शिक्षण तसेच मेकअप व स्टायलिंगचे सखोल ज्ञान दिले जाणार आहे. आम्ही या उद्योगाशी सुसंगत अशा आजच्या घडीला प्रचलित असलेल्या हेअर स्टायलिंग, मेकअप ग्रूमिंग आणि इतर अनेक विषयांचेही शिक्षण देणार आहोत."
 
webdunia
ठिकाणः दादर आणि ठाणे येथील इंडियन फॅशन अकॅडमी इन्स्टीट्यूट
कोर्स सुरु होणारः ३० एप्रिल, २०१६
कोर्सचा कालावधीः २ महिने
संपर्क साधाः +९१ ९८१९९९०९१३५ / +९१ ८४५२०४५१९९
 
इंडियन फॅशन अकॅडमी इन्स्टीट्यूट विषयी
इंडियन फॅशन अकॅडमी ही महाराष्ट्र (भारत) मध्ये २००१पासून कार्यरत असलेली सर्वात यशस्वी आणि नामवंत फॅशन व सौंदर्यविषयक अकॅडमी आहे. ही अकॅडमी तुम्हाला तुमची फॅशन व सौंदर्याबद्दलची तुमची जाण आणि आवड यशस्वी करीयर घडवण्याच्या कामी कशी वापरता येईल हे शिकवते. येथे फॅशन व सौंदर्य या विषयांवरील शिक्षण दिले जातेच, शिवाय त्या शिक्षणाला प्रात्यक्षिकांचीही जोड दिली जाते. कलात्मकता ही आपल्याला मिळालेली देणगी आहे, पण ती नीट जोपासण्याची, तिला खतपाणी घालण्याची आणि तिचा उत्कटपणे व समर्पित वृत्तीने पाठपुरावा करत राहाणे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना आयएफएमध्ये शिकता येते. या अकॅडमीमध्ये इमाम ए सिद्दीक,  शगुन गुप्ता,  संजय गुप्ता आणि ममता जोशी अशा सेलिब्रिटी तज्ज्ञांकडून फॅशन व सौंदर्य जगताविषयीचे शिक्षण मिळवण्याची सुवर्णसंधी मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi