Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Data Scientist Career: डेटा सायंटिस्ट होण्यासाठी या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Data Scientist Career: डेटा सायंटिस्ट होण्यासाठी या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
, बुधवार, 8 जून 2022 (22:42 IST)
Data Scientist Career:डेटा सायंटिस्ट कसे व्हावे: सध्या डेटा सायंटिस्टच्या नोकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. पण डेटा सायंटिस्टचे काम सोपे नसते. यासाठी गणित, सांख्यिकी संकल्पना आणि प्रोग्रामिंगची मजबूत पकड यासह विस्तृत कौशल्ये असणे आवश्यक आहेत. या कारणास्तव असे समजले जाते की डेटा सायंटिस्ट होण्यासाठी, उमेदवार स्टेम पार्श्वभूमीचा असणे आवश्यक आहे. सामान्यतः, बहुतेक डेटा वैज्ञानिक तंत्रज्ञान किंवा गणिताच्या पार्श्वभूमीतून येतात. पण असे नाही की ज्याला गणित आणि कोडिंगचे ज्ञान नाही त्याला या क्षेत्रात करिअर करणे अशक्य आहे. डेटा सायंटिस्ट होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कौशल्याशिवाय डेटा सायंटिस्ट बनणे शक्य नाही. जर कोणाला गणित आणि कोडिंगचे ज्ञान नसेल तर ते देखील डेटा सायन्समध्ये करिअर करू शकतात.या साठी तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
 
1 पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम निवडा -जर तुमच्याकडे डेटा सायन्समध्ये मदत करू शकेल अशा विषयातील पदवी नसेल, तर तुमच्यासाठी उपयुक्त असलेल्या कोर्समध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करा. अनेक विद्यापीठे डेटा सायन्स, एआय आणि अॅनालिटिक्समध्ये पूर्णवेळ मास्टर्स ऑफर कोर्स करवतात. जर पूर्णवेळ वेळ नसेल, तर तुम्ही अत्यंत सावधगिरीने प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील निवडू शकता.
 
2 फ़ंडामेंटल्स मजबूत करा -जर तुम्ही अर्थशास्त्र, वाणिज्य किंवा बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास केला असेल तर डेटा सायन्समधील काही कॉन्सेप्ट्स अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला विशेष ज्ञान नाही ते शिकण्यासाठी कोर्स करा. ही माहिती प्रोजेक्टसाठी वापरा जेणेकरून तुम्हाला अॅनालिटिक्सच्या कामाची अनुभूती मिळेल. 
 
3 डेटा किंवा बिझिनेस अॅनालिटिक्सह प्रारंभ करा - डेटा विश्लेषक आणि बिझिनेस अॅनालिटिक्सच्या भूमिकांसह प्रारंभ करणे हे एक चांगले पाऊल असेल कारण डेटा सायंटिस्टसाठी अनेक कौशल्ये आहेत. या भूमिकांमध्ये काम करताना, तुम्हाला अनेक महत्त्वाची कौशल्ये शिकायला मिळतील जी तुम्हाला काही काळानंतर डेटा सायंटिस्टच्या भूमिकेसाठी तयार करतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दहावी नंतर काय करावे? Career options after class 10th