Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Board Exam Tips : परीक्षेची तयारी कशी करावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी टिप्स

Board Exam Tips : परीक्षेची तयारी कशी करावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी टिप्स
, शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (13:50 IST)
परीक्षा म्हटली की घाबरायला येतं.आता बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत.परीक्षा जरी जवळ आल्या आहे पण तरीही विद्यार्थ्यांची तयारी अपूर्ण झालेली वाटते. त्या मुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागते. अशा परिस्थितीत ते घाई-घाईने परीक्षेच्या तयारीत लागतात. आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे पडू लागतात. परीक्षेत कसे लिहणार हा विचार करून देखील त्याचा वेळ आणि आत्मविश्वास दोन्ही कमी पडतात. आणि त्यांना घाबरायला होते. त्यांना असे वाटू लागते की त्यांची तयारी अद्याप झालेली नाही. अशा परिस्थितीत ते घाबरतात.आपल्याला काहीच येतं नाही असे त्यांना वाटू लागते. 
 
परीक्षेची तयारी कशी करावी या साठी आम्ही काही टिप्स आणि  मार्गदर्शक तत्त्वे सांगत आहोत. या मुळे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची तयारी करू शकतात. या टिप्स अवलंबवल्याने बोर्डाच्या परीक्षेत आणखी सुधारणा करता येईल. चला तर मग जाणून घेऊ या. 

1 बोर्डाच्या परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी नियमित अभ्यास करा
परीक्षेच्या तयारीसाठी नियमित अभ्यास खूप आवश्यक आहे, नियमित अभ्यासाचा अर्थ असा नाही की फक्त घरातून, किंवा कॉलेजमध्ये, शाळेतच अभ्यास केला पाहिजे, तर नियमित अभ्यास म्हणजे कॉलेज/शाळा, शिकवणी आणि अभ्यास नियमितपणे घरीच केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करू शकाल. 
 
नियमित अभ्यास केल्याने, विद्यार्थी वर्तमान विषयासह मागील विषयात ही  update राहतात , जेणेकरून ते कोणताही विषय सहजपणे विसरत नाहीत आणि अभ्यास केलेला विषय दीर्घकाळ लक्षात ठेवतात.
 
2 परीक्षेच्या तयारीसाठी वेळापत्रक तयार करा
टाइम टेबल शिवाय अभ्यास करणं जरा विचित्र वाटतं, नाही का?, पण इथे टाईम टेबल आणि नियमित अभ्यासाचं काही साम्य नाही. वेळापत्रकानुसार नियमित अभ्यास करणे ही यशाची पहिली पायरी मानली जाते.
 
3 टाइम टेबल कसे बनवायचे:
तुम्ही विषयानुसार 35-45 मिनिटे वेळ ठेवू शकता. आणि प्रत्येक दोन विषयांनंतर म्हणजेच 1:30 तासांनी 15-20 मिनिटांचा ब्रेक ठेवावा. कारण, अभ्यासादरम्यान 15 मिनिटांचा ब्रेक आरोग्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
 
4 बोर्डाच्या परीक्षेची तयारी करताना खाण्यापिण्याकडे नेहमी लक्ष द्या-
असे म्हणतात की निरोगी शरीर हे बुद्धिमान आणि निरोगी मनाचे घर आहे. कारण, तुम्ही जेवढे निरोगी, तेवढेच तुम्ही हुशार. त्यामुळेच आधी चांगले खाणेपिणे बनवा जेणेकरून अभ्यास करताना तणाव आणि आजारांपासून दूर राहता येईल.
 
शक्य तितके द्रवपदार्थ घ्या, जेणेकरून तुमची उर्जा टिकून राहते आणि तुम्ही स्वतःला चांगले अनुभवू शकता.प्रथिनेयुक्त अन्न खाल्ल्याने कोणत्याही प्रकारच्या तणावापासून मुक्त राहता. अभ्यास केलेला विषय लवकर विसरला जात नाही आणि अभ्यासलेला विषयही लवकर समजतो.
 
परीक्षेदरम्यान जंक फूड, फास्ट फूड, तेलकट पदार्थ इत्यादींचे सेवन टाळा, अन्यथा त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जे नंतर तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. म्हणून, सावधगिरी बाळगा आणि पौष्टिक पदार्थ, मासे, दूध, फळे इत्यादी ऊर्जा समृद्ध अन्न खा.
 
5 महत्त्वाच्या विषयांबद्दल मित्रांचा सल्ला घ्या -
मित्रांमध्ये नेहमी महत्त्वाच्या विषयांवर किंवा प्रश्नांवर चर्चा करा. असे केल्याने तुम्हाला त्या विषयाची चांगली माहिती मिळेल. वारंवार चर्चा केल्यामुळे तो विषय किंवा प्रश्न तुमच्या मनात घोळत राहतो जो पटकन लक्षात राहतो आणि दीर्घकाळ स्मरणातही राहतो.
 
एखादा विषय पुन्हा पुन्हा वाचूनही तुम्हाला समजत नसेल, तर तो विषय तुमच्या वर्गात मित्रांसोबत ठेवा आणि त्यांचा विचारविमर्श घ्या.
 
6 परीक्षेत विचारलेल्या जुन्या प्रश्नाचा सराव करा-
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हाला शक्य तितका अभ्यास करा जेणेकरून तुमची भीती दूर होइल. सराव केल्याने केवळ भीती दूर होत नाही, तर तुमच्या मनातील भीती देखील दूर होते जेणेकरुन तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की मी हे काम आता सहज करू शकतो.
 
बोर्डाच्या परीक्षेत मागच्या पाच वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका नियमितपणे सोडवण्याचा प्रयत्न करा.
 
दैनंदिन बनवा आणि ते सोडवत रहा. यामुळे तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल आणि बोर्डाच्या परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचीही कल्पना येईल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

BEL Recruitment: अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ-सी पदांसाठी बीईएल भरती