Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेब डिझायनिंगच्या क्षेत्रात नशीब अजमावा आणि स्वावलंबी बना

वेब डिझायनिंगच्या क्षेत्रात नशीब अजमावा आणि स्वावलंबी बना
, मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (17:07 IST)
WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब नावाच्या क्रांतीने जगाला बदलले आहे. एखादी वेबसाइट जगात कसे बदल घडू शकते हे दाखवून दिले आहे गूगल ने, अमेझॉन ने, फेसबुक सारख्या वेबसाइटने आणि या जगात असंख्य अशी नावे आहेत. 

आपण विकिपीडियाचे नाव घ्या किंवा फ्लिपकार्ट म्हणा, किंवा न्यूजच्या दुसऱ्या वेबसाइट असो, याने नव्या युगात एका नव्या क्रांतीला जन्म दिले आहे. व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो, सामान्य किंवा विशिष्ट उद्योगाशी संबंधित सामग्रीची वेबसाइट असो सामानाचा पुरवठा करणारी असो किंवा इतर कोणतेही काम असो, लोकांच्या आयुष्यात एका वेबसाइटने पूर्णपणे बदल घडवून आणले आहे.
 
खरं तर हे सांगायला देखील संकोच करू नये की शिक्षणाची पारंपरिक पद्धत वेबसाइटने केवळ बदललेलीच नाही, तर ह्याचा मूलभूत पाया देखील बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
विचार करा की ह्याचा प्रभाव किती व्यापक आहे तर या क्षेत्रात काम करणारे लोक महत्त्वाचे का नसणार? सत्य असे आहे की वेबडिझाइनर गेल्या कित्येक दशकापासून महत्त्वाचे आहे आणि आजतायगत त्याचं महत्त्व कमी झालेला नाही. वेब डिझाईनिंग मध्ये आपण साध्या एचटीएमएल वेबसाइट पासून घेऊन स्टॅटिक ऑपरेशन आणि डायनॅमिक वर्तन किंवा बिहेव्हियरची वेबसाइट बनवतात आणि त्याच्या मदतीने आपल्या ग्राहकांना फायदा देखील देतात.वेब डिझायनिंगचे बरेच भाग आहेत. चला जाणून घेऊ या.
 
डिझायनिंग पार्ट किंवा भाग -
एखाद्या वेबसाइटचे ले आउट कसे असावे, वापरकर्त्याच्या इंटरफेस कोणत्या डिझाइन पेक्षा चांगले असणार, ह्याला डिझाइन करण्यासाठी आपण स्केचिंग करता. तसेच एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये त्याचा एक नमुना किंवा प्रोटोटाइप देखील तयार करता. बरेच लोक तांत्रिक भाषेत ह्याला पीएसडी बनविणे देखील म्हणतात. येथे डिझाइन फायनल होते आणि त्यानंतर पुढील पावले टाकण्यात येतात.
 
जर आपण या क्षेत्रात करिअर करू इच्छिता तर अडॉबी फोटोशॉप, इलस्ट्रेटर, कोरल ड्रॉ सारख्या सॉफ्टवेअर मध्ये सिद्ध असायला हवं. ह्याला आपण एका स्तरावर ग्राफिक डिझाइनर देखील म्हणू शकता आणि आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीने डिझाइन कराल वेबसाइट देखील तेवढच्याच चांगल्या पद्धतीने तयार होईल. या क्षेत्रात जी लोक सॉफ्टवेअर मध्ये तज्ज्ञ आहेत ती केवळ वेबसाइटचे ले आउटच बनवत नाही तर लोगो पासून संपूर्ण इमेजचे काम देखील ह्यांच्या हाती असतं.
 
एचटीएमएल, सीएसएस माहिती - 
याला फ्रंट किंवा कोडिंग असे ही म्हणतात. म्हणजे समोर दिसणाऱ्या वेबसाइटची कोडिंग. ब्राउझर मध्ये जेव्हा आपण कोणते URL टाकल्यावर जी फ्रंट ऍड दिसते ती एचटीएमएल वर चालते. एचटीएमएल म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ह्याचे बरेच व्हर्जन म्हणजे आवृत्त्या आलेल्या आहेत. सध्या एचटीएमएल -5 वर काम केले जात आहे.
 
अशा प्रकारे एचटीएमएल ला सुंदर बनविण्याचे काम करते स्टाइलशीट. ज्याला सीएसएस (कैस्केडिंग स्टाइल शीट) म्हणतात. या दोन्ही कोडिंग लँग्वेज असतात आणि आपण ह्याला एका प्रकारे स्क्रिप्टिंग देखील म्हणू शकता. 
 
वेबसाइट डिझाइन करण्यात जावास्क्रिप्ट वापरण्यात येते, जी विशेषतः इव्हेंट साठी वापरली जाते. जसं माउस क्लिक केल्यावर कोणती कृती झाली पाहिजे. माउस रोलओव्हर केल्यावर कोणती कृती करावी, स्क्रोलिंग केल्यावर कोणती कृती करावी हे सर्व काम जावास्क्रिप्ट करते. याची माहिती आपल्याला एचटीएमएल, सीएसएस, जावा स्क्रिप्ट मध्ये मिळते. सर्वसाधारणपणे याला सोपी कोडिंग लँग्वेज म्हणतात आणि आपण यामध्ये प्रभुत्वं मिळवू शकता. 

कोडिंग झोन -
हे असे क्षेत्र आहे जी वास्तविक प्रोग्रॅमिंगच्या जगात बदल आणते. सामान्य वेबसाइट आणि गूगल मध्ये काय अंतर आहे हे परिभाषित करते की यामध्ये कोडिंग कोणत्या पातळीची झाली आहे?
 
सामान्य एचटीएमएल वेबसाइट आणि फेसबुक मध्ये काय अंतर आहे, एका सामान्य वेबसाइट आणि अमेझॉन मध्ये काय अंतर आहे, हे कोडिंग ठरवते. याचा अर्थ असा आहे की माणूस दिसायला कसा दिसत आहे, पण त्याच्या मेंदूत किती रक्तवाहिन्या असतात, रक्तविसरण कसे होते याचे प्रोग्रॅम आपण समजू शकता. 
 
कोडिंग लँग्वेज कोणत्याही वेबसाइटला नियंत्रित करतात. ती वेबसाइट गूगल सारखे सर्च इंजिन असो, फेसबुक सारखे कोणते सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असो किंवा फ्लिपकार्ट सारखी एखादी कोणती शॉपिंग वेबसाइट असो, कोडिंग हे सर्व ठरवते. 
 
या मध्ये पीएचपी ते जावा आणि एएसपी ते पायथॉन आणि सी प्लस प्लस सारख्या हेवी लँग्वेज असतात, ज्याचा वर कोणतेही फंक्शन काम करत. या वर आपण प्रभुत्व मिळवले, तर वेबसाइट मध्ये आपण मोठ्या-मोठ्या फंक्शनेलिटी ऍड करू शकता, नवीन शोध करू शकता. करिअर बद्दल बोलावे तर गूगल -फेसबुक सारख्या मोठ्या कंपन्या मध्ये अभियंताच्या पदावर आपण चांगला पगार घेऊ शकता किंवा आपले स्टार्टअप देखील सुरू करू शकता.
 
वेब कन्सलटन्सी -
जर आपण वरील तिन्ही गोष्टी पैकी काहीही करत नाही तर आपल्याला निराश होण्याची काहीही गरज नाही. आपण बऱ्याच सीएमएस पैकी कोणत्या एका वर प्रभुत्व मिळवून लोकांना कन्सलटन्सी देऊ शकता. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या ड्रॅग आणि ड्रॉप वर चालतात, पण लोकांना याची माहिती नसते. जसं वर्डप्रेस, ब्लॉगर, टंबलर इत्यादी. 
 
कश्या प्रकारे वेबसाइट बनते आणि काम करते, आपल्याला त्याबद्दलची माहिती द्यावी लागेल, जे सहसा त्याच्या ट्यूटोरीअल मध्ये दिली जाते. हे आपण यूट्यूब वरून टप्याटप्प्यात शिकू शकता आणि चांगले पैसे मिळवू शकता. 
 
वरील गोष्टी अशा आहेत की आपण पूर्णवेळ देऊन देखील करू शकता आणि चांगल्या प्रकारे कमावू शकता. या सह,आपल्याला डोमेन, होस्टिंग ची माहिती देखील ठेवावी लागते, कारण आपण जर हे कार्य करता तर हे संपूर्ण पॅकेज आपल्या कारकीर्दीत किंवा करिअर मध्ये फायदा करून देऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिल्ली चना फ्राय