Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

12वी नंतर काय करावे या संबंधित FAQS

12वी नंतर काय करावे या संबंधित FAQS
, गुरूवार, 6 एप्रिल 2023 (15:51 IST)
12वी नंतर कोणता कोर्स करावा ?
12 वी नंतर BBA, BCA प्रकारे इतर अनेक अंडरग्रेजुएट कोर्स देखील करु शकतात. जर तुम्हाला पटकन नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही डिप्लोमा किंवा कॉम्प्युटर कोर्स करू शकता.
 
12वी  नंतरचा सर्वोत्तम अभ्यासक्रम कोणता?
PCM असणार्‍यांसाठी B.Tech, B.E आणि B.Sc सर्वात चांगले कोर्स मानले जातात तर PCB असणार्‍यांसाठी MBBS, BDS आणि फार्मेसी.
 
आर्ट्स असणार्‍यांसाठी BA, BFA आणि BA LLB सर्वोत्तम कोर्स आहे आणि कॉमर्स असणार्‍यांसाठी BBA, B.Com आणि CA हे खूप चांगले कोर्स आहेत.
 
12वी नंतर कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश केव्हा सुरू होईल?
12वीच्या परीक्षेचा परिणाम आल्याच्या लगेचच एडमिशन सुरु होऊन जातं.
 
12वी नंतर स्पोर्ट्स लाइन मध्ये जाण्यासाठी काय करावे ?
12वी नंतर स्पोर्ट्स लाइनमध्ये जाण्यासाठी, तुम्ही बीएससी स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायन्स, डिप्लोमा आणि स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, बीबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट इत्यादींपैकी एक कोर्स करू शकता.
 
भारतात 12वी नंतर कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत?
 
12वी नंतर, JEE Main, NEET, NDA परीक्षा, कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT), कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी सर्टिफिकेशन टेस्ट (CPCT), कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) इत्यादी भारतातील स्पर्धात्मक परीक्षा आहेत.
 
12 वी नंतर संशोधन क्षेत्रात कसे यावे?
 
12वी नंतर संशोधन क्षेत्रात जाण्यासाठी तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), IIST, IISER किंवा IIT पैकी कोणत्याही एकामध्ये प्रवेश घेऊ शकता. या सर्व भारतातील सर्वोच्च संशोधन संस्था आहेत.
 
जर तुम्हाला वर उल्लेख केलेल्या संशोधन संस्थेत प्रवेश मिळत नसेल तर चांगल्या विद्यापीठातून बीएससी, एमएससी आणि पीएचडी करा. यानंतर तुम्ही या देशात किंवा परदेशात शास्त्रज्ञ पदासाठी जाऊ शकता.
 
12 वी नंतर कलेक्टर होण्यासाठी काय करावे?
 
कलेक्टर होण्यासाठी 12वी नंतर कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
 
 UPSC मध्ये टॉप रँक मिळाल्यास तुम्हाला IS ची पोस्ट मिळेल. मग काही प्रमोशन मिळाल्यावर कलेक्टर पद मिळू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवऱ्याच्या Female Friends वर संशय येत असेल या टिप्स तुमच्या कामी येतील, अशा प्रकार दूर करा शंका