Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IAS अधिकारी कसं बनावं

IAS अधिकारी कसं बनावं
, शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (14:05 IST)
जर आपणास आयएएस अधिकारी बनायचे असल्यास आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश करणे आणि आयएएस अधिकारी बनणं इतके सोपे नाहीत कारण त्यात बऱ्याच स्पर्धा आहे. तथापि एक योग्य दृष्टिकोन असणारा व्यक्तीच आय ए एस अधिकारी होऊ शकतो.
 
IAS अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (UPSC CSE) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, या मध्ये तीन चरण असतात -प्राथमिक (प्रारंभिक), मुख्य (मेन्स) आणि मुलाखत.
 
IAS अधिकारी बनण्यासाठी पात्र उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही स्ट्रीममध्ये पदवीधराची पदवी असणं आवश्यक आहे. उमेदवार जे शेवटच्या परीक्षेसाठी हजर आहेत आणि अंतिम परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार सुद्धा याचा प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तथापि, सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षेस हजर राहण्यासाठी एखाद्यानं बॅचलर डिग्री उत्तीर्ण झाल्याचा पुरावा प्रदान करणे आवश्यक आहे. 
 
मुख्य परीक्षेसाठी अर्जसह पदवी देणे आवश्यक आहे. सरकारी किंवा त्याचा समकक्ष मान्यता प्राप्त व्यावसायिक आणि तांत्रिक पात्रता असलेले उमेदवार देखील आय ए एस परीक्षे साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IAS च्या परीक्षेस बसण्यासाठी किमान वय 21 वर्षे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पौर्णिमेच्या निमित्त खीर बनवा, सोपी रेसिपी