Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ICSE, ISC Result 2021 रिजल्ट जाहीर, 10वी उत्तीर्णतेची टक्केवारी 99.98 आणि 12 वीची 99.76 टक्के

ICSE, ISC Result 2021 रिजल्ट जाहीर, 10वी उत्तीर्णतेची टक्केवारी 99.98 आणि 12 वीची 99.76 टक्के
, शनिवार, 24 जुलै 2021 (16:20 IST)
काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (सीआयएससीई) ने आयसीएसई (इयत्ता दहावी) आणि आयएससी (इयत्ता 12 वी) चा निकाल शनिवारी त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (cisce.org) जाहीर केला. अशा प्रकारे सर्व विद्यार्थी सहजपणे त्यांचे निकाल तपासू शकतात.
 
ICSE चा निकाल 99.98 टक्के आणि ISC मध्ये 99.76 टक्के विद्यार्थी उर्त्तीण झाले. ICSE मध्ये मुला-मुलींचा निकाल 99.98 टक्के तर ISC मध्ये मुलांचा 99.86 टक्के तर मुलींचा 99.66 टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी राहिली. या वर्षी ICSE परीक्षेत 219,499 आणि ISC मध्ये 94,011 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
 
या प्रकारे आंतरिक मूल्यांकनच्या आधारे आयसीएसई व आयएससी विद्यार्थ्यांचे निकाल मंडळाने सलग दुसर्‍या वर्षी जाहीर केले. जेव्हा २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन जाहीर केले होते, तेव्हा सुरू असलेल्या बोर्डाच्या परीक्षांचे अनेक पेपर थांबवावे लागले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उंदराची भीती