Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

JEE Mains 2022 Session 2 Result: जेईई मेन्स परीक्षा सेशन्स 2 चा निकाल जाहीर

JEE section 2 result
, सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (10:21 IST)
JEE Mainच्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर यंदा जुलै सत्रात झालेल्या दुसर्‍या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  परीक्षेचा हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारखेची गरज आहे. BE, B Tech (Paper 1) आणि B Arch, B Planning (Paper 2) परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षा 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आल्या आहेत.
 
जेईई मेन्स निकालामध्ये एनटीए कडून विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल गुण दाखवण्यात आले आहेत. तसेच देशातील रॅन्क जाहीर करण्यात आला आहे. या निकालावर त्यांची JEE Advanced 2022 ची पात्रता ठरते.
 
कसा पहाल निकाल?
NTA JEE Main वेबसाईट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
त्यानंतर स्क्रोल डाऊन करून ‘Candidate Activity’ section मध्ये जा.
JEE Main result link वर क्लिक करा.
आता पुढील विंडो मध्ये जेईई मेन्स अ‍ॅप्लिकेशन नंबर टाका तुमची जन्मतारीख टाका.
तुमचं जेईई मेन्स 2022 च्या निकालाची प्रत आता तुम्ही डाऊनलोड करू शकता.एनटीए कडून निकाल डाऊनलोड करण्यासाठी 2 लिंक्स उपलब्ध करून दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी JEE Main Paper 1 आणि Paper 2 answer key जारी करण्यात आली होती. त्यामध्ये ऑब्जेक्शन्स देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता हा निकाल जारी झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Eye Care Health Tips:रडण्याचेही फायदे आहे, जाणून घ्या