Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एम.एच.सीईटी परीक्षेसाठी इसेन्सतर्फे वेबसाईट

एम.एच.सीईटी परीक्षेसाठी इसेन्सतर्फे वेबसाईट
महाराष्ट्र आणि गुजरात मधील शाळांना ई लर्निंग साधन प्रदान करणाऱ्या इसेन्स या डिजिटल एज्युकेशन कंपनीतर्फे एम.एच.सीईटी परीक्षार्थींसाठी www.topscorer.com/mht-cet  वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटवर विविध विषयांसाठी शैक्षणिक पॅक उपलब्ध असून परीक्षेचा सराव करण्यातविद्यार्थ्यांना मदत होणार आहे. या वेबसाईटद्वारे विद्यार्थी अगदी मोफत परीक्षेचा अभ्यास करू शकतात.

राज्यातल्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी आदी साठी प्रवेश घेण्यासाठी एम.एच. सीईटी ही पूर्व परीक्षा देणे बंधनकारक आहे. नवनीत प्रकाशनाची भगिनी संस्था असलेल्या इसेन्स प्राइव्हेट.लि.चे संचालक हर्षिल गाला म्हणतात, " ज्यांना डॉक्टर आणि इंजिनीअर व्हायचंय त्यांच्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं फारचं गरजेचं आहे. आमच्या या वेबसाईटमुळे एम.एच.सीईटी साठी सराव करणे अधिक सुलभ होते. तसेच परीक्षेसाठी अन्य कुठल्याही महागडी साधनं खरेदी करावी लागत नाहीत. विद्यार्थी स्वतःला रजिस्टर करून पूर्व तयारीसाठीचे शैक्षणिक पॅकचा लाभ घेऊ शकतात". 

ई-सेंस एक झपाट्याने वाढणारी डिजिटल एजुकेशन कंपनी आहे. या कंपनीने भारतात शाळांना आणि विदार्थ्यांसाठी ई -लर्निंग साधन प्रदान करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रभावी आणि अभिनव पद्धतीने विदार्थ्यांना पाठ्यक्रमाशी जोडणे हा ईसेंसचा मुख्य उद्देश्य आहे. ईसेंस अभियांत्रिकी समाधान शिक्षण आणि शिकण्याचा अनुभव समृद्ध करतो. इथे चॉक पेक्षा पलीकडे जाऊन शिकण्याच्या वातावरणाची निर्मिती केली जाते. शिकण्यासोबत तंत्रज्ञानाचा उपयोग यांना एकीकृत करण्यावर आमचा भर आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेक्सचा वांदा, दूर करणार कांदा