rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

NHSRCL Recruitment 2020 : सीनिअर एग्जीक्यूटिव पदांसाठी रिक्त जागा

career tips
, शनिवार, 19 डिसेंबर 2020 (10:16 IST)
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)ने आपल्या अधिकृत संकेत स्थळावर सीनिअर एग्जीक्यूटिव यांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार विभागाची अधिकृत संकेतस्थळ nhsrcl.in वर 1 जानेवारी  संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. 
 
या भरती प्रक्रियाद्वारे 61 रिक्त पदांची भरती केली जाईल. या मध्ये 53 पदे सीनिअर एग्जीक्यूटिव (सिव्हिल), 3 पदे सीनिअर एग्जीक्यूटिव (एसअँड टी), 2 पदे सीनिअर एग्जीक्यूटिव (इलेक्ट्रिकल) आणि सीनिअर एग्जीक्यूटिव (जनरल), 1 पद असिस्टण्ट मॅनेजर (जनरल) साठीचे आहे. उमेदवारांना वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहितीसाठी अधिकृत सूचना वाचण्याचा सल्ला दिला जात आहे.
 
अर्ज कसा करावा-
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.nhsrcl.in वर भेट द्या. या नंतर या लिंक वर क्लिक करून आवश्यक माहिती द्या. लक्षात असू द्या की वैध वैयक्तिक मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीच भरावे.अर्ज जमा करण्याच्या पूर्वी सर्व माहिती पूर्णपणे वाचा. माहिती चुकीची दिल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. 
 
हेल्पलाइन नंबर - 
उमेदवार कोणत्याही माहितीसाठी विभागाच्या आयडी [email protected] वर किंवा 022-61087555 नंबरवर कॉल करू शकतात.
 
अधिकृत सूचना वाचण्यासाठी या संकेत स्थळावर https://www.digialm.com/per/g01/pub/852/EForms/image/ImageDocUpload/806/1113302846436545538308.pdf क्लिक करा.  
 
अर्ज करण्यासाठी या संकेत स्थळावर https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/69106/Instruction.html क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दर रोज 30 मिनिटे पायी चालण्याचे फायदे कळल्यावर कधीच कंटाळा करणार नाही