Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CPL T20 : १८ ऑगस्टपासून पहिल्या टी-२० लीग स्पर्धेला सुरुवात

CPL T20 : १८ ऑगस्टपासून पहिल्या टी-२० लीग स्पर्धेला सुरुवात
, बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (16:59 IST)
करोना व्हायरसमुळे खेळ जगाला देखील चांगलाच फटका बसला आहे. पण आता 4 महिने उलटून गेल्यावर व्हायरसपासून काळजी घेत क्रीडा मैदानात पुन्हा एकदा सामने सुरू झालेत. यात विशेष म्हणजे येत्या १८ ऑगस्टपासून कॅरेबियन प्रीमियर लीग ला सुरूवात होणार आहे. करोना व्हायरसच्या काळात सुरू होणारी ही पहिली टी-२० लीग स्पर्धा असेल.
 
सीपीएल टी-२० स्पर्धा ३४ दिवस खेळवली जाईल. याचा अंतिम सामना १० सप्टेंबर रोजी होईल. स्थानिक प्रशासन आणि सरकारकडून परवानगी मिळाल्याने ही स्पर्धा त्रिनिदाद अॅण्ड टोबॅगो येथे खेळवली जाणार आहे. 
 
स्पर्धेसाठी सर्व संघातील खेळाडू त्रिनिदादमध्ये दाखल झाल्यावर त्यांना दोन आठवडे क्वरंटाइन करण्यात येईल. परदेशातून येणार्‍या खेळाडूंची निघण्यापूर्वी आणि आयोजन स्थळी पोहचल्यावर करोना चाचणी घेतली जाईल.
 
ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवली जाईल. तसेच करोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन केले जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू प्रवीण तांबे त्रिनबागो नाइट रायडर्स संघाकडून खेळताना दिसेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शतकानुशतके पाहिले गेलेले अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे