Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kanda-Kairi Kochkayi कंदा-कैरी कोचकय कशी बनवायची? उन्हाळ्यातील सोपी आणि चविष्ट रेसिपी

onion raw mango recipe
Kanda-Kairi Kochkayi कंदा-कैरी कोचकय ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं. हे अस्सल खानदेशी आणि महाराष्ट्रीयन उन्हाळ्याचं खास पदार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा उन्हाळ्यात भाजीला काही नसतं किंवा जेवणाची चव वाढवायची असते, तेव्हा हे कोचकय एकदम भारी लागतं. 
 
हे कसं बनतं?
कच्ची कैरी: १ मध्यम आकाराची (सोलून फोडी केलेली)
कांदा: १ मोठा (उभा चिरलेला)
लाल तिखट: १ ते २ छोटे चमचे (तुमच्या आवडीनुसार)
गूळ किंवा साखर: १ मोठा चमचा
मीठ: चवीनुसार
फोडणीसाठी: तेल, मोहरी, हिंग आणि हळद
 
कृती : 
कैरी आणि कांदा मिसळून घ्या. खलबत्त्यामध्ये थोडं कुटा. (कांदा एकदम बारीक करायचा नाही, तो थोडा' कोचलेला' असावा). आता त्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि गूळ घाला. हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र कुटून घ्या जेणेकरून गूळ आणि तिखट सगळीकडे व्यवस्थित लागेल. मग एका छोट्या कढल्यात तेल गरम करा. त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली की हिंग आणि हळद घालून ही गरम फोडणी कुटलेल्या कांदा-कैरीवर ओता. चमच्याने सर्व मिश्रण नीट मिक्स करा.
 
काही खास टिप्स:
मिक्सरचा वापर टाळा: जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल आणि तुम्ही कैरी किसून आणि कांदा बारीक चिरुन वापरु शकता.
शेंगदाण्याचा कूट: जर तुम्हाला आवडत असेल, तर यात थोडा जाडसर शेंगदाण्याचा कूट घातल्यास चव अजून छान लागते.
हे ताजं खाण्यात खरी मजा आहे.
हे कोचकय तुम्ही गरमागरम बाजरीची भाकरी, पिठलं-भात किंवा नुसत्या वरणासोबत तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गॅस न वापरता बनवा झटपट या सोप्या रेसिपी