साहित्य : 1/2 किलो हिरवी मिरची, 1 वाटी मोहरीची डाळ, पाव चमचा मेथीची (कच्ची) पूड, 3/4 चमचा हळद, 1 चमचा हिंग, दीड ते दोन वाट्या मीठ, 6 लिंबाचा (रस), 1/2 वाटी तेल.
कृती : सर्वप्रथम एका ताटात किंवा परातीत मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. कढईत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की ते परातीतल्या पदार्थांवर ओतावे व झार्याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा. मिरच्या धुऊन फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. नंतर त्याचे तुकडे करावे. त्यात 2 चमचे बाकी ठेवून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच डाळीचा मसाला घालावा. बरणीत 2 चमचे मीठ घालावे. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून एक चमचे मीठ घालावे. दुसर्या किंवा तिसर्या दिवशी 6 लिंबाचा रस काढून लोणच्यात घाला. स्वादिष्ट मिरचीचे लोणचे तयार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा