Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

अननसची चटणी रेसिपी

Pineapple chutney
, बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (13:59 IST)
साहित्य-
अननस - अर्धा कप
गूळ - एक टीस्पून
चिंचेचा कोळ - एक चमचा
लाल मिरची - एक सुकी
मोहरी - अर्धा चमचा
जिरे - अर्धा चमचा
हळद - एक चिमूटभर
काश्मिरी लाल मिरची - अर्धा चमचा
कढीपत्ता 
तेल - अर्धा चमचा
ALSO READ: अक्रोड चटणी रेसिपी
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करा. नंतर मोहरी आणि जिरे घाला आणि त्यांना तडतडू द्या. आता कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घाला आणि हलके परतून घ्या. तसेच आता त्यात चिरलेले अननसाचे तुकडे घाला आणि मध्यम आचेवर ३-४ मिनिटे परतून घ्या. आता हळद, काश्मिरी तिखट, मीठ आणि गूळ घालून चांगले मिसळा. आता चिंचेचा कोळ घाला आणि मंद आचेवर पाच मिनिटे शिजू द्या, अननस मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. नंतर ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करा. तर तयार आहे आपली गोड आंबट अशी मसालेदार अननसाची चटणी रेसिपी पराठा, डोसा, इडली यांसोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mahashivratri Special Naivaidy रसमलाई कलाकंद रेसिपी