rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिनाभर टिकणारी गोड-आंबट चटणी; हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल

Amla Chutney Recipe
, गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025 (08:00 IST)
साहित्य-  
आवळा - २५० ग्रॅम
किसलेला गूळ - १५० ग्रॅम
मीठ चवीनुसार
लाल तिखट - अर्धा चमचा
भाजलेले जिरे पूड -अर्धा चमचा
बडीशेप पूड -अर्धा चमचा
काळे मीठ - १/४ चमचा
तेल -एक चमचा
पाणी - अर्धा कप
ALSO READ: उपासाची खजूर चिंचेची चटणी
कृती- 
सर्वात आधी आवळे स्वछ धुवा. आता प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घाला आणि  शिट्ट्या होईपर्यंत उकळवा. थंड झाल्यावर, बिया काढून टाका आणि आवळा हलके मॅश करा किंवा मिक्सरमध्ये बारीक करा. आता एका पॅनमध्ये गूळ आणि अर्धा कप पाणी घाला. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मंद आचेवर शिजवा. बारीक केलेला आवळा घाला आणि पाच मिनिटे मंद आचेवर शिजवा. आता त्यात लाल तिखट, मीठ, काळे मीठ, भाजलेले जिरे पावडर आणि बडीशेप पावडर घाला आणि ढवळत राहा जेणेकरून चटणी  चिकटणार नाही. चटणी थोडी घट्ट होऊ लागली की गॅस बंद करा. चटणी थंड होऊ द्या, नंतर ती काचेच्या बाटलीत भरा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. ही चटणी १-२ महिने टिकेल. तसेच तयार चटणी पराठा किंवा पुरी सॊबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगसाठी नवीन ब्लड टेस्ट: CANTEL™ आली भारतात!