साहित्य : 250 ग्रॅम करवंद, कोथिंबीर किंवा पुदिन्याची 1/4 जुडी, 1 चमचा मीठ, 10 ग्रॅम जिरे, 4 चमचे साखर, तिखट चवीनुसार.
कृती : करवंला मधून चिरून त्यातील बिया काढून घ्यावा. नंतर त्यात कोथिंबीर किंवा पुदीना, मीठ, तिखट व जिरे व साखर टाकून बारीक वाटून घ्या. ही चटणी फार रुचकर लागते. पोळी किंवा परोठे सोबत सर्व्ह करा.